मांजर हा खूप गोंडस प्राणी असला तरीही तो एक प्राणीच आहे. मांजरीने लोकांवर हल्ला केल्याच्या अनेक बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. पण आता रशियातून एक भयानक प्रकार समोर आला आहे. तिथे मांजरींनी चक्क आपल्याच मालकिणीला फाडून खाल्ले आहे. (cat eat their owner because of hunger)
मांजरींना खायला न दिल्यामुळे मांजरींनी भयंकर रूप धारण केले होते. त्यांना खायला काही मिळाले नाही तर त्यांनी स्वतःच्या मालकिणीला फाडून खाल्ले आहे. रशियातील बटायस्क शहरात एका महिलेला तिच्या २० मांजरींनी एकत्र खाल्ल्याची घटना समोर आल्याने सर्वांनाच धक्का बसला.
सुमारे दोन आठवड्यांपासून घरातून वास येत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली, त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. महिलेच्या मृत्यूनंतर घरातील मांजर उपाशी होत्या. त्यामुळे जे मिळेल ते मांजरी खात होत्या. त्या मांजरींना घराच्याबाहेर सुद्धा पडता येत नव्हते, त्यामुळे त्यांनी आपल्या मालकिणीलाच खाल्ले आहे.
शेजाऱ्यांच्या माहितीवरून पोलिसांनी महिलेच्या घरात प्रवेश केला असता, आतील दृश्य पाहून पोलिसही हादरले होते, महिला मांजरींनी वेढलेल्या अवस्थेत जमिनीवर पडली होती. तिच्या अंगावर सुमारे २० मांजरी बसल्या होत्या. आजूबाजूला रक्त पडलेले होते आणि मांजरीचे तोंडही लाल होते.
मांजरींनी त्यांच्या मालकिणीच्या शरीराचा अर्धा भाग खाऊन संपवला होता. ज्या मांजरींनी ही भयानक गोष्टी केली आहे, त्या मांजरींना अमेरिकेतील सर्वात शांत जातीची मांजर मानले जाते, मेन कून मांजर असे या मांजरीच्या जातीचे नाव आहे.
मेन कून मांजरी त्यांच्या मोठ्या आकारासाठी ओळखल्या जातात. ही एक अत्यंत लोकप्रिय जात आहे, जी सध्या जागतिक पाळीव मांजरीच्या लोकप्रियतेच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. मेन कून मांजरी त्यांच्या निष्क्रिय स्वभावासाठी देखील ओळखल्या जातात.
दोन आठवड्यांपूर्वी मालकिणीचा मृत्यू झाला आणि ती घराच्या आत जमिनीवर पडली होती. त्यामुळे मांजरांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था होत नव्हती. अशा स्थितीत भूक शमवण्यासाठी समोर जे उपलब्ध होते, ते पोट भरून त्यांनी स्वतःला जिवंत ठेवले होते.
महत्वाच्या बातम्या-
पंकजा मुंडेंचे भाजप सोडण्याच्या दिशेने पहिले पाऊल? त्या कृतीने समर्थकांना दिला सुचक संदेश
आमचा मुलगा शत्रूच्या गोळ्यांचा बळी असता तर, अभिमान वाटला असता, पण..; दुर्दैवी बापाची मन हेलावून टाकणारी कहाणी..
भाजपकडून आमदारांना फोन करून दबाव टाकला जातोय, नाना पटोलेंचा गंभीर आरोप