Share

फेसबूकवर अश्लील भाषेत रुपाली पाटलांची केली बदनामी, १६ मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी मनसेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यामुळे त्यांच्यावर अनेकांनी टीका केली होती. असे असताना आता पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रुपाली पाटील यांची बदनामी केल्याप्रकरणी १६ मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (case file against 16 mns leader)

रुपाली पाटील यांची सोशल मीडियावर मनसेचे १६ पदाधिकारी बदनामी करत होते. त्यामुळे आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्याच्या फरासखाना पोलिस ठाण्यात मनसेच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फेसबूकवर एक करोड ताईवर नाराज असणाऱ्यांचा ग्रुप आहे. हा ग्रुप तयार करुन रुपाली पाटील यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करुन बदनामी करण्यात आली आहे. या प्रकरणी वकील पुनम काशिनाथ गुंजाळ, ज्यांचे वय आता २७ वर्षे आहे, त्यांनी ही तक्रार दाखल केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते असलेले सागर चव्हाण, गजानन पाटील, प्रसाद राणे, धृवराज ढकेडकर, राजेश दंडनाईक, कुमार जाधव, सचिन कोमकर, सावळ्या कुंभार, निजामुद्दीन शेख, सुधीर लाड यांच्यासह आणखी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर भादवि कलम ३५४ अ, ड, ५००, ३४ आयटी ऍक्ट क ६६, क ६७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेसबूकवर एक करोड ताईवर नाराज ग्रुपवरुन पुनम गुंजाळ यांना फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. फिर्यादी यांनी ही फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारल्यानंतर त्यांना त्या ग्रुपवर रुपाली पाटील यांचा फोटो दिसला.

त्या ग्रुपवर पुनम गुंजाळ यांनी बघितले की, विना परवानगी रुपाली पाटील यांचा फोटो वापरुन अश्लील शब्दांत त्यांची खिल्ली उडवली जाते. त्यानंतर पुनम गुंजाळ यांनी अश्लील भाषेत बोलू नका असे पदाधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर सुधीर लाडने पर्सनल फेसबूक अकाऊंटवरुन लाईव्ह करत रुपाली पाटील यांना शिवीगाळ केली. आता याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून याचा तपास पोलिस करत आहे.

महत्वाच्या बातम्या-
National Language Controversy : अजय-सुदीपच्या हिंदी भाषेच्या वादावर कलाकारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…
मल्टीबॅगर शेअर! ‘या’ स्टील पाईप कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना दिला 737 टक्क्यांच्या परतावा
या’ निर्णयाने सामान्यांच्या खिशाला आणखी झळ तर रामदेवबाबा व अदाणींच्या संपत्तीत तुफान वाढ

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now