Share

टाटांचा दणका ! ह्युंडाईला मागे टाकत टाटा मोटर्सची भारतात सरशी; आता बारी मारूतीची…

टाटा मोटर्स या कंपनीसाठी 2021 हे वर्ष खूप आव्हानात्मक होते. पण शेवटच्या डिसेंबर महिन्यात टाटा मोटार्स कंपनीने चांगली कामगिरी केली आहे. टाटा मोटर्स कंपनीने विदेशी कंपनी असलेल्या ह्युंदाई कंपनीला मागे टाकले आहे. टाटा मोटार्स ही आता भारतातील दुसरी सर्वात मोठी कार कंपनी बनली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी कार बनवणाऱ्या टाटांचे स्वप्न सत्यात उतरले आहे.

डिसेंबरच्या 2021 चा कार विक्रीचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये ह्युंदाई कारच्या विक्रीमध्ये लक्षणीय घट झाली आहे. तर टाटा मोटार्सने वर्षाच्या शेवटी आपल्या कारची चांगली विक्री केली आहे. देशासह जगात मोठे कोरोना वादळ सुरु असून देखील टाटाने आपल्या विक्रीमध्ये केलेली वाढ खूपच लक्षनिय आहे. त्यामुळे सर्वच स्तरातून टाटांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

डिसेंबरमध्ये टाटा मोटर्सने ह्युंदाई मोटार्सपेक्षा जास्त कार विकून दुसऱ्या क्रमांक मिळवला आहे. ही कामगिरी केल्यामुळे आता टाटा मोटार्स ही आता भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी ठरली आहे. दिवसेदिवस टाटाच्या वेगवेगळ्या कारची लोकप्रियता वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. मागील काही महिन्यांमध्ये ह्युंदाईच्या कारच्या विक्रीत बरीच घट झाली आहे.

डिसेंबर 2021 चा कार विक्रीचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या अहावालामध्ये सविस्तर गाड्यांच्या विक्रीचा माहिती देण्यात आली आहे. यामध्ये ह्युंदाई मोटार्सने एकूण 32 हजार 312 कारची विक्री केली आहे. या कारची विक्री वेगवेगळ्या विभागात झाली होती. डिसेंबर 2021 च्या अहवालानुसार ह्युंदाई कारच्या विक्रीत सुमारे वार्षिक 32 टक्क्यांची घट झाली आहे. त्याचवेळी, मासिक विक्रीतही सुमारे 13 टक्क्यांची घट झाली आहे.

याउलट टाटा मोटार्सची कार विक्री मोठ्या प्रमाणात झाली आहे. टाटा मोटर्सचा डिसेंबरचा कार विक्री अहवाल पाहता, कंपनीने एकूण 35 हजार 299 कार विकल्या आहेत. टाटा माटार्सच्या कार विक्रीत वार्षिक 50 टक्क्यांची वाढ झाली आहे.टाटा मोटार्सने नोव्हेंबर 2021 मध्ये 29 हजार 780 कारची विक्री केली आहे. टाटाच्या मासिक कार विक्रीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे ह्युंदाईच्या पुढे जाण्यास टाटा मोटार्स गेली आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये, टाटा मोटर्सने भारतातील प्रत्येक सेगमेंटमध्ये चांगल्या कार सादर केल्या आहेत. विशेषत: एसयूव्ही सेगमेंटमध्ये नुकत्याच लाँच झालेल्या छोट्या एसयूव्ही टाटा पंच तसेच कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये टाटा नेक्सॉन आणि टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिकने टाटाचे नशीब बदलले आहे. परिणामी, टाटा ह्युंदाईपेक्षा जास्त कारची विक्री करु शकली.
ताज्या बातम्या
 दारू पिऊन आऊट झालेल्या आर्यन खानने एअरपोर्टवर केली लघवी केल्याचा व्हिडीओ व्हायरल; वाचा खरं काय…
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागन; ट्विट करत लोकांना केले ‘हे’ आवाहन
.. मग फिरोज खानशी लग्न करून इंदिरा गांधींची मुलं ब्राह्मण कशी?
प्रचंड नुकसान झाल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या या व्यावसायिकांनी ढसाढसा रडत टाहो फोडला होता

इतर

Join WhatsApp

Join Now