Homeताज्या बातम्याप्रचंड नुकसान झाल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या या व्यावसायिकांनी ढसाढसा रडत टाहो फोडला...

प्रचंड नुकसान झाल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या या व्यावसायिकांनी ढसाढसा रडत टाहो फोडला होता

शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन पुन्हा एकदा घडले आहे. पुणे जिल्ह्यातील लांडेवाडी-चिंचोडी गावात आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीची परवानगी शासनाने शर्यतीच्या आदल्या दिवशी रद्द केली, त्यामुळे या शर्यतीसाठी आलेल्या लहान व्यावसायिकांचे नुकसान झाले. त्यांना मदत करण्यासाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.

१ जानेवारी २०२२ रोजी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी त्यांच्या लांडेवाडी-चिंचोडी गावात बैलगाडा शर्यत आयोजित केली होती. या बैलगाडा शर्यतीसाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांकडून रीतसर परवानगी घेण्यात आली होती. या बैलगाडा शर्यतीमुळे लांडेवाडी-चिंचोडी गावात यात्रेचे स्वरूप आले होते.

या शर्यतीसाठी छोटे-मोठे व्यावसायिक लांडेवाडी-चिंचोडी गावात आले होते. लहान-मोठे व्यावसायिक यांनी त्यांची स्टॉल, दुकाने शर्यतीच्या मैदानाजवळ उभारली होती. बैलगाडा प्रेमी फार मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी येत असतात. हेच बैलगाडा प्रेमी या लहान-मोठ्या दुकानदारांचे हक्काचे ग्राहक असतात.

पण शासनाने अचानक बैलगाडा शर्यत आदल्या दिवशी रात्री रद्द केली. त्यामुळे या लहान-मोठ्या दुकानदारांचे मोठे नुकसान झाले. या दुकानदारांचे पोट हातावर असते.जर दुकानातील वस्तू विकली गेली, तरच त्यांना पैसे मिळतात. रोजच्या व्यवहारांवर त्यांची मिळकत असते. अचानक बैलगाडा शर्यत रद्द झाल्यामुळे त्यांना मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

या व्यावसायिकांना आर्थिक त्रासातून जावे लागत आहे. या दुकानदारांना मदत करण्यासाठी शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील पुढे आले आहेत. माजी खासदार आढळराव पाटलांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत लोकांना या व्यावसायिकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.

शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पोस्टमध्ये म्हंटले आहे की, शिवसेना नेहमीच सर्वसामान्यांच्या पाठीशी उभी राहिली आहे. या हातावर पोट भरणाऱ्या व्यावसायिकांना झालेल्या आर्थिक त्रासातून बाहेर काढण्यासाठी माझ्या शिरूर लोकसभा मतदार संघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सढळ हाताने शक्य तितकी आर्थिक मदत माझ्या लांडेवाडी कार्यालयात जमा करावी.

महत्वाच्या बातम्या :-
धक्कादायक! छोट्या भावाला जास्त एकर जमीन दिल्याने संतापला, वडिलांची गळा चिरून केली हत्या
आयटम म्हणत मुलीची छेड काढणे पोलिस पुत्राला पडले महागात, मुलीने ‘असा’ शिकवला धडा
“मोदीजी आता चीनची वाट लावणार, त्यांचे डोळे तर बघा, लाल लाल झालेत”