Share

राज ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात; गाडीत होते ‘हे’ मराठी अभिनेते

राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात झाला आहे. अहमदनगरच्या पुढे असलेल्या घोडेगाव जवळ हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात दिग्दर्शक केदार शिंदे आणि अभिनेता अंकुश चौधरी यांच्या गाड्यांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या अपघातात कोण कोण जखमी झालंय हे अजूनही कळालेलं नाही. सदर अपघात हा घोडेगावजवळ झाला आहे एवढंच सध्या समजू शकलं आहे. अपघात कसा झाला समजू शकलेलं नाही पण ताफ्यातील एकामागून एक तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या. यामध्ये केदार शिंदे आणि अंकुश चौधरी यांच्या गाड्यांना नुकसान झाले आहे.

त्यांच्या बोनेटचं नुकसान झालं आहे. या किरकोळ अपघातानंतर कोणीही थांबलं नाही ताफा औरंगाबादकडे रवाना झाला. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचे औरंगाबादमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. औरंगाबादला जात असताना ते अहमदनगरच्या एसटी बसस्थानक चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करण्यासाठी थांबले होते.

यापुर्वी त्यांनी अहमदनगरच्या बायपास चौकातील एका हॉटेलमध्ये शाकाहारी जेवण केलं आणि तिथेही त्यांचं चांगलंच स्वागत झालं. त्यानंतर त्यांनी बसस्थानक चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन केलं. त्यावेळीही मनसेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. अगदी ढोलताशांच्या गजरात राज ठाकरेंचे स्वागत करण्यात आले.

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने राज ठाकरे सभा घेणार आहेत. सर्वात आधी ते पुण्यात आले आणि तिथेच त्यांनी मुक्काम केला होता. आज सकाळी त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या आणि मग ते औरंगाबादसाठी रवाना झाले. त्यापुर्वी त्यांनी वाटेतच त्यांनी वढू तुळापूरला जाऊन संभाजीराजेंच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले होते.

सभा निर्विघ्न पार पडावी यासाठी पुण्यातील राज ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर शेकडो पुरोहित जमले होते. चारही वेदांमधील मंत्रोच्चाराद्वारे जवळपास १०० ते १५० पुरोहितांनी राज ठाकरेंना आशीर्वाद दिले. यासाठी पुण्यातील राजमहाल येथे सकाळीच ब्रह्मवृंद मोठ्यासंख्येने हजर देखील झाले होते.

महत्वाच्या बातम्या
टेम्पो चालकाचा मुलगा MPSC मध्ये महाराष्ट्रात आला पहिला, पुर आला तरी सोडला नाही अभ्यास
वसंत मोरे अजूनही पक्षावर नाराज? पक्ष सोडण्याचा निर्णय? ‘त्या’ कृतीने शिक्कामोर्तब झाल्यात जमा
आम्ही अंगावर केसेस घ्यायला तयार; सभेसाठी पोलिसांनी अटी घालताच ‘राज’पुत्राने दंड थोपटले
मुस्लिमांची घरे उद्ध्वस्त, जहांगीरपुरीत अत्याचार; असदुद्दीन ओवेसींना भाषणादरम्यान रडू कोसळले 

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now