भारत जगभरात कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. शेतकरी हा या कृषिप्रधान देशाचा कणा आहे. भारतातील शेतकऱ्यांनी कृषिक्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. देशातील अनेक शेतकऱ्यांनी कृषिक्षेत्रात मोठे नावलौकिक मिळवले आहे. महाराष्ट्रातील धनकवडी गावातील दोघा भावांनी कांदा पिकातून लाखोंची कमाई केली आहे. या कमाईतून बांधलेल्या बंगल्यावर दोघा भावांनी दीडशे किलो कांद्याची प्रतिमा साकारली आहे.
नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त कांदा या नगदी पिकाची लागवड केली जाते. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात धनकवडी नावाचे गाव आहे. या गावात साईनाथ व अनिल या दोन्ही भावांनी मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन घेतले आहे. २०१९-२० या वर्षात कांदा पिकाला बाजारात विक्रमी दर मिळाला होता. या वर्षी साईनाथ व अनिल या दोन्ही भावांना कांद्याच्या पिकातून लाखोंची कमाई झाली होती.
कांद्याची विक्री करून मिळालेल्या पैशांतून त्यांनी एक बंगला बांधण्याचा निर्णय घेतला. कांद्यातून मिळालेल्या पैशांमुळे आपल्याला हा बंगला बांधता आला, अशी भावना त्यांच्या मनात होती. म्हणून त्यांनी कांद्याला याचे श्रेय देण्याचे ठरवले. त्यासाठी दोन्ही बंधूंनी बंगल्यावर कांद्याची प्रतिकृती साकारण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली.
शेवटी नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे त्यांनी दीडशे किलोच्या कांद्याची प्रतिमा बनवली. ही कांद्याची प्रतिमा त्यांनी त्यांच्या बंगल्यावर बसवली आहे. त्यांच्या या बंगल्याची संपूर्ण नाशिक जिल्ह्यात चर्चा होत आहे. साईनाथ व अनिल या दोन भावांनी सांगितले की, कांद्याच्या पिकामुळे आमची आर्थिक परिस्थिती पूर्ण बदलली. त्यामुळे आम्ही आमच्या घरावर कांद्याची प्रतिमा साकारली आहे.
साईनाथ जाधव व त्यांचे बंधू अनिल जाधव यांच्याकडे वडिलोपार्जित ३० एकर शेतजमीन आहे. ते आपल्या शेतजमिनीत गेली ५ वर्षे झाली कांद्याच्या पिकाची लागवड करत आहेत. यापूर्वी ते कांद्याव्यतिरिक्त इतर पिकांची लागवड करत होते. पण त्यातून त्यांना फारसे उत्त्पन्न मिळाले नाही. नंतर साईनाथ व अनिल या दोन भावांनी कांदा पिकाची लागवड करण्याचा निर्णय घेतला.
कांद्याच्या पिकामधून त्यांना चांगले उत्पन्न मिळू लागले. गेल्या दोन वर्षात कांद्याची विक्री करून लाखोंची कमाई केली आहे. साईनाथ व अनिल या दोन भावांच्या कल्पनेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. नेहमीच बिन भरवशाचे पीक म्हणून ओळखले जाणाऱ्या कांद्याच्या पिकामुळे या दोन भावांचे नशीब उजळले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
माझ्यासोबत सेक्स करा आणि मार्क्स मिळवा, प्राध्यापकाची खुली ऑफर ; पोलीसांनी ठोकल्या बेड्या
शाहजाद्यामुळे विराटला राजीनामा द्यावा लागला; ठाकरे सरकारमधील बड्या मंत्र्याचा गंभीर आरोप
हे आहेत ‘या’ आठवड्यातील छप्परफाड परतावा देणारे शेअर्स, एकाने दिला ९०% तर एकाने ५०% परतावा






