सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ अपलोड होत असतात. पण कधी कोणता व्हिडिओ व्हायरल होईल हे सांगता येत नाही. प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा ट्विटरवर काही ना काही शेअर करत असतात. एवढेच नाही तर ते त्यांच्या चाहत्यांना उत्तरेही देताना दिसून येत असतात. (businessmen anand mahindra on nagar boy jugaad)
आनंद महिंद्रा हे अनेकदा सोशल मीडियावरचे व्हायरल व्हिडिओ शेअर करताना दिसतात. जे खुप हटके असतात. आताही त्यांनी एक व्हिडिओ त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ अहमदनगरच्या एका तरुणाचा आहे, ज्याने आपल्या भन्नाट जुगाडाने एक जिना तयार केला आहे.
या व्हिडीओमध्ये काही लोखंडी रॉड एका भिंतीला लागलेले दिसतात. सुरुवातीला ते नक्की काय आहे हे कळत नाही. दिसायला ते पायऱ्यांसारखे दिसतात. पण भिंतीला लागून असल्यामुळे ते वापरणार कसं असाही प्रश्न पडतो. मात्र त्यानंतर जे होतं ते हैराण करणारं आहे.
आनंद महिंद्रा यांनी व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की आऊटस्टँडिंग. खुप सहज भावणारा हा जुगाड आहे. भिंतीला बाहेरुन हा फोल्डिंग जिना लावला आहे. स्कॅन्डिनेव्हियन डिझायनर्सला सुद्धा हेवा वाटेल असे हा जुगाड आहे. मला हा व्हिडिओ कोणाचा आहे हे माहिती नाही. पण हा व्हिडिओ व्हॉट्सऍपवर आला होता.
https://twitter.com/anandmahindra/status/1548184682491428864?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1548184682491428864%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fzeenews.india.com%2Fhindi%2Foff-beat%2Fanand-mahindra-on-social-media-shares-jugaad-video-of-invisible-staircase-trending-on-internet-entertaining%2F1261259
हा व्हिडिओ आतापर्यंत १० लाख वेळा पाहिला गेला आहे. एवढेच नाही तर ५४ सेकंदांच्या या व्हिडिओला ५१ हजारांहून अधिक लाईक्स आणि ६ हजारांहून अधिक रिट्विट्स मिळाले आहेत. अनेक लोक कमेंट सेक्शनमध्ये त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसले.
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ नगरच्या पंचवीर चावडीचा आहे. हा जिना बनवणाऱ्या तरुणाचे नाव समीर बागवान असे आहे. तिथे अरुंद गल्ली असल्यामुळे तिथे जिना बनवणं कठीण जात होतं. त्यातूनच त्याला या फोल्डिंग जिन्याची कल्पना सुचली होती.
महत्वाच्या बातम्या-
बांगरांनी दिलेलं ‘ते’ आव्हान सेनेच्या रणरागिणीनेने स्विकारलं; म्हणाल्या, संतोष बांगरांनी माझ्या…
‘या’ बॉलिवूड अभिनेत्याने केल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा पार; फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण
शिवसेनेनंतर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार फोडणार? मुख्यमंत्र्यांनी केला धक्कादायक दावा