भारत आणि इंग्लंड यांच्यातील (IND vs ENG) 5व्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. रवींद्र जडेजाने भारतासाठी शतक पूर्ण केले पण संघाला 375 धावांवर 9वा धक्का बसला. जडेजा आऊट झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतला आणि संघाला 400 चा टप्पा गाठता येणार नाही असे वाटले. पण कर्णधार जसप्रीत बुमराहने क्रिजवर येताच धुमाकूळ घातला.
स्टुअर्ट ब्रॉड 84 वे षटक टाकत होता. या षटकात बुमराहने त्याला एकून 35 धावा कुटल्या. हा कसोटी क्रिकेट इतिहासातील एक सर्वात मोठा विक्रम आहे. यापूर्वी कोणत्याही गोलंदाजाने एका षटकात 28 पेक्षा जास्त धावा दिल्या नाहीत. स्टुअर्ट ब्रॉडने 2007 टी-20 विश्वचषकात युवराज सिंगविरुद्धच्या षटकात 36 धावा दिल्या होत्या.
दरम्यान, पहिल्या दिवशी टीम इंडियाची अवस्था 5 बाद 98 धावा अशी झाली होती. त्यावेळी ऋषभ पंत मैदानावर आला. मैदानावर येताच ऋषभ पंतने जोरदार फटकेबाजी करण्यास सुरवात केली. ऋषभ पंतने इंग्लंडचे स्टुअर्ट ब्रॉड, मॅथ्यू पॉट्स आणि जेम्स अँडरसन या अनुभवी गोलंदाजांना धु- धु धुतले.
यावेळी टीम इंडियाचा डावखुरा अनुभवी फलंदाज रवींद्र जडेजा याने ऋषभ पंतला चांगली साथ दिली. रवींद्र जडेजा आणि ऋषभ पंत यांनी मिळून 222 धावांची भागीदारी केली. या सामन्यात ऋषभ पंत झंझावाती खेळी करत केवळ 89 चेंडूत शतक ठोकले आहे. यामध्ये 15 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे.
पण आज फक्त बुमराहचीच चर्चा होत आहेत कारण बुमराह अशी कामगिरी करणारा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. आता हा योगायोग आहे की टी-20 मध्ये युवराज सिंगने स्टुअर्ट ब्रॉडलाच एकाच ओव्हरमध्ये 6 षटकार ठोकले होते आणि आज पुन्हा बुमराहने त्याचीच पुनरावृत्ती करत ब्रॉडला एकाच ओव्हरमध्ये 35 धावा ठोकल्या. विशेष म्हणजे त्याने कसोटीमध्ये ही कामगिरी केली आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू-
35- जसप्रीत बुमराह विरुद्ध स्टुअर्ट ब्रॉड बर्मिंगहॅम (2022)
28- ब्रायन लारा वि रॉबिन पीटरसन जोहान्सबर्ग (2003)
28- जॉर्ज बेली ऑफ वि जेम्स अँडरसन पर्थ (2013)
28- केशव महाराज विरुद्ध जो रूट पोर्ट एलिझाबेथ (2020)
महत्वाच्या बातम्या
पैलवानांच्या तक्रारी आल्यानंतर भारतीय कुस्तीगीर संघटनेची मोठी कारवाई, शरद पवारांना धक्का
मुख्यमंत्री शिंदे अॅक्शन मोडमध्ये; राष्ट्रवादीच्या 600 कोटींच्या कामांना लावला ब्रेक, वाचा काय घेतला निर्णय?
‘माझ्यावर रोज २० ते २५ जण बलात्कार करतात, आई- वडीलही त्यांना साथ देतात; मुलीचा व्हिडीओतून आरोप