Share

इंग्लंडमध्ये सापडलेली ‘ती’ कवटी आहे ब्रिटीशांच्या क्रुरतेची साक्षीदार, १८५७ ची भयानक घटना ऐकून हादरुन जाल

इंग्लडमधील एका पबमध्ये सापडलेली सैनिक प्रमुख आलम बेगची कवटी अमृतसरच्या अजनाला येथे घडलेल्या ब्रिटिशांच्या क्रूरतेची साक्षीदार आहे. ब्रिटीश अधिकारी ग्रिसलीने ती कवटी ब्रिटनच्या महाराणीला भेट म्हणून दिली होती. त्यानंतर मद्यप्रेंमींनी त्या कवटीची खिल्ली उडवत तिला एका पबमध्ये ठेवले होते. (british punished alam beg)

२०१४ सालीच अजनाल्यात ती दुर्दैवी विहीर सापडली हा एक अद्भुत योगायोग होता, तर दुसरीकडे ब्रिटिश इतिहासकार प्रा. किम ए. वॅगनरने आलमच्या कवटीला शोधले. मग संशोधन करून त्यांनी त्याचा संपूर्ण इतिहास तर काढलाच, पण एक पुस्तकही लिहिले.

मियां मीर येथे तैनात असलेल्या ५०० सैनिकांमध्ये आलम बेग नावाचा ब्रिटिश सैन्यातील एक भारतीय सैनिक होता. १८५७ च्या उठावात, जेव्हा हे सैनिक पूर्व पंजाबकडे जात होते, तेव्हा इंग्रज सैन्याने त्यापैकी २१८ जणांना जम्मूच्या रावी नदीच्या काठावर मारले आणि अजनाला येथे २३७ जणांना गोळ्या घातल्या होत्या, तर १४ जणांना विहिरीत जिवंत टाकले होते.

या सर्व घटनेत सैनिकांचे प्रमुख कानपूरचे रहिवासी आलम बेग हे इंग्रजांच्या तावडीतून निसटण्यात यशस्वी झाले. नंतर इंग्रजांनी त्यांना कानपूरमधून पकडून सियालकोटला नेले आणि तोफेच्या तोंडाला बांधून उडवले. यानंतर त्याची कवटी पाण्यात उकळून त्याची कातडी काढण्यात आली आणि ग्रिसलीने ट्रॉफी बनवून ती ब्रिटनच्या महाराणीसाठी इंग्लंडला नेली. नंतर तिला एका पबमध्ये ठेवण्यात आले.

२०१४ मध्ये, इंग्लंडच्या एसेक्स शहरात असलेल्या लॉर्ड क्लाइडच्या पबची विक्री सुरू झाली, त्यानंतर तेथे ठेवलेली ही कवटी ऐतिहासिक जॉन पबच्या मालकाने लंडनच्या क्वीन मेरी विद्यापीठाचे इतिहासकार प्रा. किम ए. वॅगनरला दिली. प्रो. वॅगनरला त्या कवटीच्या डोळ्याच्या पोकळीत एक चिठ्ठी सापडली.

त्या चिठ्ठीमध्य त्या शूर सैनिकाची संपूर्ण बंडाची कहाणी लिहिली होती. ते वाचून त्यांनी स्वतः त्यावर संशोधनही केले. अजनाल्यावर सुरू असलेल्या संशोधनाची माहिती घेतली आणि पंजाब विद्यापीठाचे प्रा. सेहरावत यांच्याशी संपर्क प्रस्थापित केला.

अजनाल्यात सापडलेल्या सांगाड्यावर संशोधन करणाऱ्या टीममध्ये समावेश असलेल्या बीएचयूचे प्रा. ज्ञानेश्वर चौबे यांनी सांगितले की, वॅगनरवर भारतीय इतिहासाचा खोलवर प्रभाव आहे. ते आलमची कवटी येथे आणणार असून धार्मिक विधीनुसार त्याच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत.

बंगालच्या ४६ व्या पायदळात सार्जंट असलेल्या आलम बेगची ही कवटी आहे. त्याला ब्रिटीश सरकारने रेजिमेंटच्या अनेक लोकांसह तोफेने उडविले. १८५७ च्या उठावाचा तो सर्वात मोठा बंडखोर होता. आलम बेगचे वय सुमारे ३२ वर्षे होते. त्याची उंची पाच फूट, साडेसात इंच होती.

महत्वाच्या बातम्या-
अजय देवगण आणि काजोलचे घर आहे तब्बल ६० कोटी रुपयांचे; घरातले फोटो पाहून डोळे विस्फारतील
राजकारणातील सर्वात मोठी बातमी! राज ठाकरेंना अटक होणार? पहा नेमकं काय घडलयंं
प्रायव्हेट जेट ते डायमंडचे कानातले…, जॅकलीनला सुकेशने दिले होते कोट्यावधींचे गिफ्ट्स; ईडीने केले जप्त

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now