महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोग्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. तसेच त्यांच्या या भूमिकेला भाजपही पाठिंबा देताना दिसून येत आहे. (brijubhushan singh shocking statement on raj thackeray)
अशात राज ठाकरेंचा अयोध्या दौराही चांगलाच चर्चेत आहे. पण या दौऱ्याला एक भाजप खासदार विरोध करताना दिसून येत आहे. या दौऱ्याला भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी विरोध केला आहे. अयोध्येत येण्याआधी त्यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, त्यानंतर त्यांनी इथे यावे, असे ब्रिजभूषण सिंग यांनी म्हटले आहे.
ब्रिजभूषण यांना अयोध्येत येऊ न देण्यासाठी आंदोलनालाही सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांनी गोंदासहीत बऱ्याच ठिकाणी पोस्टर लावले आहे. ५ जूनला लाखोंच्या संख्येने आंदोलनाला उतरुन राज ठाकरेंना विमानतळावरच अडवणार, असे ब्रिजभूषण सिंग यांनी म्हटले आहे.
आता ब्रिजभूषण सिंग यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा राज ठाकरेंनाबाबत मोठी वक्तव्ये केली आहे. माझा महाराष्ट्राला विरोध नाहीये. पण आमच्या लोकांना मनसेने खुप मारले आहे. मी त्याचा विरोध करत आहे. त्यामुळे मी राज राकरेंना माफी मागितल्याशिवाय इथे येऊ देणार नाही, असे ब्रिजभूषण सिंग यांनी म्हटले आहे.
राज ठाकरेंचा विरोध यासाठी केला जातोय कारण त्यांनी उत्तर भारतीयांचा अपमान केला आहे. २००८ पासून ते उत्तर भारतीयांचा अपमान करत आहे. माफी शिवाय राज ठाकरेंच्या बापालाही अयोध्येत येऊ देणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्यही ब्रिजभूषण सिंग यांनी केले आहे.
राज ठाकरे हा भगवा नाहीये, कालनैमी आहे. जर खरंच भगवा धारण केला असेल, तर रामाच्या भक्तांची माफी त्यांनी मागावी, असे ब्रिजभूषण यांनी म्हटले आहे. तसेच शिवसेना नेते आदित्य ठाकरेही अयोध्या दौऱ्यावर येणार आहे. त्यावरही त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. पण त्यावर बोलताना ते म्हणाले की, त्यांना माझा काहीच विरोध नाहीये.
तसेच राज ठाकरेंचा मुद्दा हा फक्त आजचा मुद्दा नाहीये. मी २००८ पासून त्यांची वाट पाहत होतो. राज ठाकरे हे मुंबईच्या बाहेर कधी निघत नाही. आता कुठे ते निघाले तर मला या मुद्यावर बोलता येत आहे. त्यामुळे त्यांना जर इथे यायचे असेल, तर आधी माफी मागावी आणि अयोध्येत यावे, नाहीतर त्यांना अयोध्येत पायही ठेऊ देणार नाही, असे ब्रिजभूषण यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
डॉक्टरेट सोडून अभिनेता होण्यासाठी आला होता मुंबईत, आता पृथ्वीराजमध्ये ‘मोहम्मद घोरी’ बनून सगळ्यांवर पडतोय भारी
लॉक अप जिंकल्यानंतर मुनव्वर फारुकीचे डोंगरी येथे जल्लोषात स्वागत, ट्रॉफी फिरवत म्हणाला..
whats app: आता कोणीही वाचू शकणार नाही तुमची पर्सनल चॅट, फक्त एकदा ऑन करा ही सेटिंग