उत्तर प्रदेशातील भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडींवर भाष्य केलं आहे. माध्यमांशी बोलताना बृजभूषण सिंह यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. सोबतच शिवसेनेवर देखील तिखट शब्दात टीका केली आहे.
यावेळी बोलताना बृजभूषण सिंह यांनी म्हंटलं की, ‘जेव्हा शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी तुमच्याशी बंडखोरी केली तर दु:ख होत आहे. मात्र भाजपासोबत मिळून निवडणूक लढवली. आणि भाजपाच्या पाठित खंजीर खुपसून काँग्रेसचा हात तुम्ही पकडला, अशी आठवण बृजभूषण सिंह यांनी करून दिली.
असं म्हणत बृजभूषण सिंह यांनी ठाकरेंना भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसल्याची आठवण करून दिली आहे. ‘निवडणूक लढवताना आमच्या कार्यकर्त्यांची साथ घेतली. मात्र नंतर सत्तेसाठी तुम्ही कुठे गेला? असा संतप्त सवाल बृजभूषण सिंह यांनी यांनी यावेळी उपस्थित केला.
तसेच पुढे बोलताना बृजभूषण सिंह यांनी म्हंटलं आहे की, जे भाजपासोबत उद्धव ठाकरेंनी केले तेच शिवसैनिक त्यांच्यासोबत करत असल्याच बृजभूषण सिंह यांनी म्हंटलं आहे. तसेच वेळ न वाया घालवता पंतप्रधान मोदी यांच्याकडे शरण या अन्यथा अस्तित्व उरणार नाही, असा गर्भित इशाराही बृजभूषण सिंह यांनी ठाकरेंना दिला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बृजभूषण सिंह यांचे कौतुक केले होते. भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला केलेल्या विरोधावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बृजभूषण यांचे कौतूक केले होते.
संजय राऊत म्हणाले होते की, बृजभूषण शरण सिंह हे त्यांची भूमिका मांडत आहेत. बृजभूषण सिंह यांना मी अनेक वर्ष ओळखतो. तो माणूस लढवय्या आहे. त्यांचे महाराष्ट्राशी संबंध फार जुने आहेत. आम्ही त्यांना नेताजी म्हणतो. ते स्वत: पैलवान आहेत. अनेक कुस्तीगीर त्यांनी निर्माण केले.तसेच आम्ही एकत्र काम केले आहे तो माणूस मागे हटणार नाही असं वाटतं अशा शब्दात त्यांनी बृजभूषण शरण सिंह यांचे कौतुक केले होते.
महत्वाच्या बातम्या-
कालीन भैयाच्या सुनेनं बिकीनी घालून पाण्यात लावली आग, फोटो पाहून तुमचेही उडतील होश
आतापर्यंत जगापासून लपलेले आहे कामाख्या मंदिराचे ‘हे’ रहस्य, वाचून तुम्हालाही बसणार नाही विश्वास
उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का! पुण्यातील ‘हा’ माजी मंत्रीही होणार शिंदे गटात सामील