Share

लग्नाच्या ऐनवेळी नवरीच्या मैत्रिणीने सांगितले नवरदेवाचे ‘ते’ सिक्रेट; नवरीने तिथेच लग्नाला दिला नकार

उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यात एका वधूने लग्नाला नकार दिला कारण फक्त वर नकली केस लावून लग्नासाठी आला होता. ही धक्कादायक घटना उस्राहर भागातील उदेतपुरा गावातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री लग्नसोहळा होणार होता, पण लग्नात नवरदेवाची पोलखोल झाल्यामुळे वधूने लग्नाला नकार दिला. यानंतर सगळ्यांनी मुलीला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण तिने काही ऐकले नाही. (bride rejected groom)

एवढेच नाही तर मुलीने मुलाची बाजू ऐकून घेतली नाही, तेव्हा प्रकरण आणखी चिघळले. यानंतर दोन्ही बाजूंमध्ये हाणामारी झाली. त्याचवेळी मुलगी तिच्या कुटुंबीयांसह गेस्ट हाऊस सोडून आपल्या घरी गेली. हे प्रकरण पोलिसांपर्यंतही पोहोचले, त्यानंतर नवरदेवाला मिरवणूक घेऊन तसेच परतावे लागले.

मिळालेल्या माहितीनुसार, भरथाना पोलीस स्टेशन परिसरातील ध्यानपुरा येथील रहिवासी महेश चंद्र यांनी त्यांची मुलगी संगीता हिचे लग्न बिधुना येथील अजय कुमारसोबत निश्चित केले होते. अजयला जेव्हा त्यांनी पहिल्यांदा बघितले तेव्हा तो खूपच देखणा दिसत होता आणि त्याच्या डोक्यावरचे केसही छान दिसत होते. त्यामुळे लग्न ठरले.

२२ फेब्रुवारीला रात्री बँडची मिरवणूक मोठ्या थाटामाटात आली व पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम थाटामाटात करण्यात येणार होता. सर्व काही ठीक चालले होते, इतक्यात नवरीच्या मैत्रिणीला नवऱ्याच्या केसात काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आले. तिने बघितले की मुलाच्या डोक्यावरचे केस खोटे आहे, तेव्हा मुलीने त्या नवरीला याबाबत सांगितले.

सुरुवातीला संगीताला भीती वाटत होती, पण जर संपूर्ण आयुष्याचा प्रश्न होता त्यामुळे तिने ही बाब आपल्या कुटुंबियांना सांगितली आणि लग्नास नकार दिला. नातेवाइकांनी पाहिले असता, त्या मुलाने प्रत्यक्षात डोक्यावर विग घातल्याचे आढळून आले. यावर घरच्यांनीही संगीताला साथ दिली आणि मुलाच्या बाजूने फसवणूक केल्याचा आरोप केला.

मुलीच्या वडिलांनी सांगितले की, डोक्यावर केस नसतील तर आधी सांगायला हवे होते, अशा प्रकारे फसवणूक करून लग्न केल्यास आयुष्यात कधीही तेढ निर्माण होऊ शकतो. यामुळे दोन्ही बाजूंमध्ये तणाव निर्माण झाला होता. मारामारीपर्यंत परिस्थिती पोहोचली. त्याचवेळी संगीताचे वडील महेश यांनी लग्नाला स्पष्ट नकार दिला आणि ते नवरीला घेऊन चालल्या गेले.

महत्वाच्या बातम्या-
रोहित शर्मापेक्षा घातक असलेल्या युवा फलंदाजाला BCCI ने डावलले; कारकीर्द संपण्याच्या मार्गावर?
ठाकरे सरकारचा जोरदार पलटवार, भाजपच्या ‘या’ बड्या नेत्यावर गुन्हा दाखल
तरूण शेतकऱ्याने शेतात मोती पिकवत कमावला तुफान पैसा; पंतप्रधान मोदींनीही केले कौतुक

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now