Share

शुभमन गिलनंतर ‘या’ क्रिकेटपटूसोबत जोडलं जातंय सारा तेंडुलकरचं नाव, ‘तो’ फोटो झाला व्हायरल

प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरची मुलगी सारा तेंडूलकर ही सोशल मीडियावर खुप सक्रीय असते. अनेकदा ती तिच्या फोटोंमुळे आणि व्हिडिओंमुळे चर्चेतही येत असते. तसेच सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोविंग सुद्धा जास्त असून लाखो लोक तिचे चाहते आहे. (brevis and sara tendulakar photo viral)

अशात ती आता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. सारा तेंडूलकरचे नाव आता एका परदेशी खेळाडूसोबत जोडले जात आहे. काही दिवसांपूर्वी, सारा संघ आणि तिचा धाकटा भाऊ अर्जुन तेंडुलकर, जो संघाचे प्रतिनिधित्व करत आहे, त्याला चिअर करण्यासाठी ती मैदानावर आली होती.

त्या सामन्यातील एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये सारा मुंबई इंडिन्सच्या जर्सीमध्ये दिसून येत आहे. जेव्हा सारा मैदानात चिअर करण्यासाठी आली, तेव्हा तिचे नाव थेट बेबी एबी म्हणजेच डेवाल्ड ब्रेविसशी जोडण्यात आलं. सध्या सोशल मीडियावर यांच्या दोघांची चांगलीच चर्चा रंगली आहे.

सोशल मीडियावर ब्रेविसच्या आणि साराच्या प्रेमाच्या चर्चा रंगल्या आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये दोघांची नजर एकमेकांना भिडली आणि ब्रेविस तिच्या प्रेमात पडला आहे, असे म्हटले आहे. त्यानंतर दोघांच्याही नावाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

दरम्यान, या पोस्टबाबत कोणतीही खात्री पटली नसून हे एका चाहत्याने बनवलेली पोस्ट आहे. आयपीएल सुरु असताना सारा अनेकदा चर्चेत येत असते. सारा तेंडूलकरचे नाव भारतीय संघाचा खेळाडू शुभमन गिल याच्यासोबत जोडले जाते, पण त्याबाबत पुर्णपणे माहिती समोर आलेली नाही.

तसेच डेवाल्ड ब्रेविस हा १८ वर्षांचा असून तो आधीच रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव लिंडी मारी असे आहे. लिंडी ही सोशल मीडियावर खुप सक्रिय असते. तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ब्रेविसचे अनेक फोटोही शेअर केलेले आहे.

महत्वाच्या बातम्या-
प्रचंड गदारोळानंतरही मिटकरींचा माफी मागण्यास नकार; उलट म्हणाले, मी कशाला माफी मागू?
गर्लफ्रेंड अथियाला पाहिल्यानंतर केएल राहुलला नीट बॅटिंग जमत नाही, खराब फॉर्ममुळे नेटकरी संतापले
विवेक अग्निहोत्रींवर ‘या’ कारणामुळे भडकले शीख लोकं, म्हणाले, ‘द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करू नका’

खेळ ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now