राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी हे त्यांच्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत येत असतात. पण आता ते एका वक्तव्यामुळे वादात अडकले आहे. अमोल मिटकरी यांच्या एका वक्तव्यामुळे ब्राम्हण महासंघानं पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले आहे. (bramhan mahasangha angry on ncp)
आंदोलनावेळी ब्राम्हण महासंघाचे नेते आनंद दवे हे खुपच आक्रमक झाल्याचे दिसून आले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला इशाराही दिला आहे. आज आम्ही फक्त कार्यलयात घुसलो आहे, उद्या घराघरात घुसू, असा इशारा आनंद दवे यांनी दिला आहे.
मी माझी बायको तुम्हाला देत आहे असा त्या मंत्राचा अर्थ होतो का? शेकडो वर्षांपासून हा मंत्रोपचार केला जात आहे. इतके दिवस तुमच्यापैकी कोणाला सुचलं नाही का? की हा मंत्र चुकीच्या पद्धतीने बोलला जातोय. हा मंत्र नाहीये. तो लग्नात बोलला जात नाही, असे आनंद दवे यांनी म्हटले आहे.
तसेच तुम्ही चुकीचा मंत्र सांगत असून तो चुकीच्या पद्धतीने मांडत आहात. तुम्ही पौराहित्य केलंय का? तुम्हाला मंत्रोपचाराचा काही अधिकार आहे का? भावना कळतात का तुम्हाला? हा हिंदू धर्माचा अपमान असून फक्त ब्राम्हण समाज पौराहित्य करत नाही, माळी, लिंगायत इतर समाजही हे करतात, असे आनंद दवे यांनी म्हटले आहे.
तसेच हा हिंदू धर्मियांचा अपमान आहे. हे आम्ही सहन करणार नाही. आज आम्ही कार्यालयात घुसलो उद्या घराघरात घुसू हेच मला सांगायचं आहे. आमच्या मंत्रांचे स्पष्टीकरण मागणारे तुम्ही कोण? तुमच्याकडे स्पष्टीकरण मागावं इतका आमचा स्तर खाली आलेला नाही, असेही आनंद दवे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
प्रियांका चोप्राच्या मुलीच्या नावात आहे ‘या’ खास व्यक्तीचा उल्लेख, जाणून घ्या
‘या’ कारणामुळे दाक्षिणात्य चित्रपटांसमोर बॉलिवूड चित्रपट टिकत नाहीत; संजय दत्तने सांगितले कारण
मुंबईच्या संघात होणार ‘या’ घातक गोलंदाजाची एंट्री, पुन्हा गाजवणार IPL; रोहितने घेतला मोठा निर्णय