सोशल मीडिया कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. आता असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये काही मुले एका मुलीला सूटकेसमध्ये लपवून तिला हॉस्टेलमधून बाहेर काढताना दिसत आहेत. पण ती मुलं तिथेच पकडली गेली आहे, सध्या सोशल मीडियावर या व्हिडिओची चांगलीच चर्चा रंगली आहे. (boyfriend pack girlfriend in suitcase)
या घटनेचा व्हिडिओ अनेक युजर्सनी ट्विटरवर शेअर केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. व्हिडिओ हजारो वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडिओवर सर्व ट्विटर युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कॉलेजच्या हॉस्टेलमधील काही मुलांनी एका मुलीला एका मोठ्या सुटकेसमध्ये लपवले होते. त्यानंतर त्यांनी तिला बाहेर नेण्यास सुरुवात केली. मात्र गेटजवळ येताच तिथल्या गार्ड्सला त्यांच्यावर संशय आला. त्यानंतर गार्डने त्यांना गेटजवळ अडवले.
सुटकेस मुलांना उचलणे जड जात असल्याचे गार्डला लक्षात आले. त्यामुळे गार्डने सुटकेसची झडती घेण्याचे ठरवले. अशात गार्डने सुटकेस उघडताच त्याला धक्का बसला. त्या सुटकेसमधून चक्क मुलगी बाहेर आली. हा व्हिडिओ कर्नाटकातील मणिपाल येथील विद्यार्थ्यांचा आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच कमेंट्सचा महापूर आला. यावर यूजर्स वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट करत आहेत. कोणाला हा व्हिडिओ खूपच मजेदार वाटला, तर कोणी विद्यार्थ्यांच्या या कृतीवर नाराजी व्यक्त केली. काही लोकांनी तर यावर संपातही व्यक्त केला आहे.
https://twitter.com/shibubuu27/status/1488834391283744770?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1488834391283744770%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.livehindustan.com%2Fviral-news%2Fstory-girl-in-suitcase-in-manipal-boys-caught-outside-hostel-htgp-5727963.html
काही वापरकर्त्यांनी याला प्रँक म्हटले आणि म्हटले की सूटकेसमध्ये मुलगी कशी येऊ शकते. एका यूजरने लिहिले, आम्ही योग्य वेळी कॉलेज संपल्यानंतर निघतो. त्याचवेळी आणखी एका यूजरने मजेशीरपणे म्हटले की, गर्लफ्रेंडला सूटकेसमध्ये फिरायला आवडत असेल.
एकाने लिहिले की, रिस्क है तो इश्क है, याचे हे उत्तम उदाहरण आहे. तर दुसर्या यूजरने लिहिले की, हे पाहून मला हसू आवरता येत नाहीये. अशात एका युजरने म्हटले की, त्याने कुटुंबातील सदस्यांचा विचार केला असेल. काही लोक त्याला व्हॅलेंटाईन डे प्लॅन्स ऑफ बॉय म्हणतात.
महत्वाच्या बातम्या-
नाशिकमध्ये पतीची हत्या करण्यामागे पत्नीचा आणि डोसावाल्याचा हात; ‘असा’ झाला खुलासा
बंडातात्या कराडकरांनी अजित पवारांना काढला चिमटा; “उद्धव ठाकरे सरळमार्गी, पण ढवळ्याशेजारी पवळ्या बांधला अन्…”
VIDEO: आकाश ठोसरसोबत डेटच्या चर्चांनंतर रिंकूने पोस्ट केले खास reel, चाहते झाले घायाळ






