Share

ब्रेकअपनंतर गर्लफ्रेंडवर नजर ठेवण्यासाठी तिच्याच बेडखाली राहायचा तरुण; ‘अशी’ झाली पोलखोल

अमेरिकेतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे एका मुलीने तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे नाते संपवले होते, पण तरीही त्या तरुणाला तिच्यापासून वेगळे व्हायचे नव्हते.प्रेयसीला सोडण्याऐवजी त्याने तिच्या पलंगाखाली लपण्याचे ठिकाण बनवले. हे तुम्हाला विचित्र वाटेल, पण हे खरं आहे. (boyfriend dont leave his gf after breakup)

अमेरिकेतील अटलांटा येथे राहणाऱ्या लिबी क्लीव्सने तिच्या एक्स बॉयफ्रेंडशी संबंधित एक घटना सोशल मीडियावर शेअर केली आहे. डेली स्टारच्या वृत्तानुसार, महिलेने टिकटॉकवर सांगितले की, ती एका चांगल्या ख्रिश्चन मुलासोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघे एकत्र चर्चमध्ये जात होते आणि लिबीने तिच्या बॉयफ्रेंडला तिच्या कुटुंबियांनाही भेटवले होते.

लिबीने सांगितले की, आम्ही लग्नाचा विचार करत होतो. त्यानंतर आमच्या नात्यात असं काही घडलं की आम्ही एकमेकांना पाहणं बंद केलं. आम्ही वेगळे झालो होतो. त्यानंतर आमचे नाते पूर्ण संपले होते. पण एके दिवशी मला माझ्या पलंगाखाली कोणीतरी श्वास घेत असल्याचा मोठा आवाज ऐकला. मग मला कळले तो कित्येक दिवसांपासून माझ्या बेडच्या खालीच राहत होता.

लिबीने सांगितले की, त्याला मी लग्न करण्याइतपत बुद्धिमान वाटले नाही. त्यामुळेच आमचे ब्रेकअप झाले. एका रात्री मला मोठ्याने घोरण्याचा आवाज आला आणि मी माझ्या पलंगाच्या आजूबाजूला पाहिले, त्यानंतर जेव्हा मी पलंगाखाली बघितले तर तो झोपलेला होता.

जेव्हा लिबीने तिच्या बॉयफ्रेंडला या कृत्याबद्दल विचारले तेव्हा त्याने सांगितले की, लिबी एकांतात काय करते हे पाहायचे आहे. याशिवाय, त्याने लिबीला असेही सांगितले की तो अनेक आठवड्यांपासून तिथेच राहत होता आणि तिचा टूथब्रश सुद्धा वापरत आहे.

लिबीने सांगितले की तिचा प्रियकर एक सनकी व्यक्ती आहे, म्हणून तिने याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दिली, त्यानंतर पोलिसांनी तिची मदत करत त्याला तिच्यापासून पूर्णपणे दूर केले आहे. सोशल मीडियावर लोक लिबीच्या या निर्णयाचे कौतुक करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-
अभिनेत्री शिवानी रांगोळेने प्रियकर विराजसशी गुपचूप उरकलं लग्न? व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य आलं समोर
ऑस्कर विजेत्या coda ने चोरली बॉलिवूड चित्रपटाची कथा? सलमान खानने केली होती ‘त्या’ चित्रपटात भूमिका
इंजिनिअरच्या घरात सापडलं कोट्यवधींचं घबाड, संपत्ती मोजून अधिकाऱ्यांचीही झाली दमछाक

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now