विद्यार्थ्याचे होते शिक्षीकेसोबत शारिरीक संबंध, नंतर साखरपुडा ठरला अन्.., वाचून धक्का बसेल 

तामिळनाडू पोलिसांनी बुधवारी एका 23 वर्षीय महिला शिक्षिकेला अटक केली आहे. शिक्षिकेवर तिच्याच 17 वर्षीय विद्यार्थ्यासोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोप आहे. जेव्हा शिक्षिकेने संबंध तोडले तेव्हा या रागातून विद्यार्थ्याने आपले जीवन संपवले. घटना चेन्नईपासून 20 किमी अंतरावरील अंबत्तूर येथील एका शाळेतील आहे.

तामिळनाडूची राजधानी चेन्नईपासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या अंबत्तूर येथील सरकारी अनुदानित शाळेत ही शिक्षिका शिकवते. पोलिसांनी सांगितले की, शिक्षीका तीन वर्षांपासून मुलांना शिकवत होती. तेव्हा तो दहावीत होता.

पोलिसांनी सांगितले की, तो कधीकधी इतर विद्यार्थ्यांसोबत तिच्या घरी जायचा. दरम्यान, दोघांमध्ये अफेअर सुरू झाले. 30 ऑगस्ट रोजी महाविद्यालयातील आर्ट फॅकल्टीमध्ये सहभागी होण्यासाठी समुपदेशन सत्रानंतर विद्यार्थी घरी आला. त्याच दिवशी संध्याकाळी त्याने आपल्या खोलीत जीवन संपवले.

तामिळनाडूतील अंबत्तूर येथील महिला पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक जोथी लक्ष्मी यांनी सांगितले की, दुसऱ्या व्यक्तीसोबत साखरपुडा ठरल्यानंतर शिक्षिकेने विद्यार्थ्यासोबतचे नाते संपुष्टात आणले होते, मात्र विद्यार्थ्याला ते पूर्वीसारखेच जपायचे होते. त्यानंतर विद्यार्थ्याने आत्महत्या केली.

त्याच्या मृत्यूमागे दुसरे काही कारण असल्याचा संशय त्याच्या आईला होता. पोलिसांनी अशीही माहिती दिली की, त्यांना त्या महिला शिक्षीकेचे आणि त्या मुलाचे फोटो त्याच्या फोनवरून सापडले आहेत. त्यानंतर पोलिसांनी महिला शिक्षिकेला अटक केली.

शिक्षीकेविरूद्ध आयपीसीच्या कलम 305- मुलाला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे आणि लैंगिक अत्याचारापासून मुलांचे संरक्षण कायद्यानुसार लैंगिक छळाच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी शिक्षीकेची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीला, तामिळनाडू पोलिसांनी एका 20 वर्षीय गर्भवती महाविद्यालयीन विद्यार्थिनीला सालेम जिल्ह्यात तिच्या अल्पवयीन वर्गमित्राशी लग्न केल्याच्या आरोपाखाली अटक केली. विद्यार्थी अल्पवयीन असताना एप्रिलपासून बेपत्ता होता. तो त्याच्या वर्गमित्राकडे राहत होता. त्याला आणण्यासाठी विद्यार्थ्याच्या पालकांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी विद्यार्थ्याचा शोध घेतला.

महत्वाच्या बातम्या
sharad pawar : बारामतीच्या जाणता राजाने हात लावला तर राख होते; पडळकरांची शरद पवारांवर जहरी टीका
namibia : फुकटात मिळालेले चित्ते भारताला पडणार महागात, नामिबियाने बदल्यात मागितली ‘ही’ मौल्यवाण वस्तु
shinde group : शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीची बारी! शिंदेंनी राष्ट्रवादीचा बडा नेता फोडत थेट पवारांना दिला धक्का