गेल्या काही महिन्यांपासून राज्यात अनेक महिला अत्याचारांच्या घटना घडत आहे. आता अशीच एक घटना पुण्यातून समोर आली आहे, ज्यामुळे संपुर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. नराधम पुतण्याने आपल्या चुलतीवरच बलात्कार केला होता, आता पोलिसांनी त्याला अटक केली आहे. (boy rape his aunty)
एका नराधम पुतण्याने आपल्या चुलतीवरच बलात्कार केला होता. तसेच ती पोलिस स्टेशनमध्ये जाऊ नये म्हणून त्याने जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे धमकीने घाबरलेल्या महिला आठ दिवस शांत बसलेली होती. त्यानंतर तिने पोलिस ठाणे गाठले आहे.
आता पोलिसांनी त्या तरुणाला अटक केली आहे. नात्याला काळीमा फासणारी ही घटना भिगवण जवळ घडली आहे. पोलिसांनी पुतण्याविरुद्ध बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी आदी कलमांर्गत गुन्हा दाखल केला आहे. संबंधित घटना ही ४ मार्च ते ८ मार्च दरम्यान घडली आहे.
नराधम तरुण हा पीडित महिलेचा पुतण्याच होता. एकदिवशी तो घरात घुसला आणि अचानक त्याने चुलतीसोबत चुकीचे वर्तवणूक करण्यास सुरुवात केली. त्याला चुलतीने विरोध केला असता तो संतापला आणि त्याने थेट तिच्यावर बलात्कार केला.
तसेच ही गोष्ट ती कोणाला तरी सांगेन अशी भिती पुतण्याच्या मनात होती. त्यामुळे त्याने ही गोष्ट कोणाला सांगितली तर जीव घेईन अशी धमकी दिली होती. त्यामुळे महिला खुप घाबरुन गेली होती आणि तिने याबाबत घरातल्या लोकांनाही सांगितले नाही.
अशात तो वारंवार तिला त्रास देऊ लागला, या त्रासाला कंटाळून अखेर आठ दिवसांनी तिने पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. या घटनेच तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रुपेश कदम करत आहे.
महत्वाच्या बातम्या-
आजोबांचा नाद नाय! वयाच्या 65 व्या वर्षी सुरू केली औषधी वनस्पतींची शेती, आता कमावतात लाखोंमध्ये
‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ५० हजार रुपये; ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय
‘द कपिल शर्मा शो’मध्ये प्रमोशनसाठी विवेक अग्निहोत्रींकडे मागितले ‘एवढे’ रूपये, प्रसिद्ध अभिनेत्याचा खळबळजनक खुलासा