Share

फिल्मी स्टाईलमध्ये भांग भरणारा तरुणच निघाला धोकेबाज; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीसोबत केले ‘हे’ भयानक कृत्य

गेल्या काही महिन्यांपासून प्रेम प्रकरणातून अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. तसेच महिला अत्याचाराच्यांही अनेक घटना समोर येत आहे. आता अशीच एक घटना उत्तर प्रदेशमधून समोर आली आहे. ज्यामुळे संपुर्ण राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. (boy fake promise to girl and rape her)

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधून बलात्काराची घटना समोर आली आहे. जिथे प्रियकराने लग्नाच्या बहाण्याने प्रेयसीसोबत शारीरिक संबंध केले, त्यानंतर तिला सोडून पळून गेला. तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सध्या पोलिस आरोपीचा शोध घेत आहे.

पोलिसांनी सांगितले की, दोघे कॉलेजमध्ये भेटले होते आणि त्यांचे प्रेमसंबंध होते. असे सांगितले जात आहे की मुलाने आधी मुलीला प्रपोज केले, त्यानंतर दोघांची भेट होऊ लागली. यादरम्यान मुलाने तिला अनेकवेळा लग्नाचे आश्वासनही दिले होते. पण तो सतत वेगवेगळी कारणे देऊन तिला टाळत होता.

पीडितेने आपल्या तक्रारीत पोलिसांना सांगितले की, पंडित आणि कुटुंबीयांना न जुमानता या मुलाने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी भांगेत फिल्मी स्टाईलमध्ये मंदिरात कुंकूही भरले होते. त्यानंतर गेल्या दीड वर्षांपासून तो तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत होता.

तसेच मुलाने तिच्याकडे अनेकदा पैशांची मागणी केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. आधी १० हजार नंतर ३० हजार मागितले. मुलीने त्याला विश्वासात घेऊन त्याला ते पैसे दिले. यानंतर प्रियकर तिच्यापासून दूर जाऊ लागला आणि म्हणाला की, तो आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न करू शकत नाही. त्यानंतर मुलीने पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

डेप्युटी एसपी नबेला शुक्ला यांनी सांगितले की, पीडितेची तक्रार आली होती. ती एका इन्स्टिट्यूटमध्ये शिकत होती. जिथे तिची एका मुलाशी भेट झाली, त्यानंतर दोघेही प्रेमात पडले. मुलाने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले आणि लग्नाचे खोटे आश्वासन देत शारीरीक संबंध बनवले. पीडितेच्या तक्रारीवरून भादंवि कलम ३७६ आणि कलम ४०६ च्या गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिस त्याचा शोध घेत आहे.

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now