Share

Pune police : इतिहासात पहील्यांदाच पोलिसांना दंड घेण्याऐवजी भरावा लागला भुर्दंड; वाचा पुण्यातला किस्सा

Pune police | दिवाळीनिमित्त मोठ्या संख्येने लोकं शहरातून आपल्या गावाकडे जातात. त्यामध्ये अनेक विद्यार्थीही असतात. बाकी वेळेस त्यांना सुट्टी भेटत नसल्याने ते गावाकडे किंवा त्यांच्या घरी जात नाहीत. सणासुदीलाच त्यांना आपल्या घरी जायला वेळ मिळतो.

बरेच विद्यार्थी एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात शिक्षणासाठी स्थलांतर करत असतात. पुणे त्यातीलच एक जिल्हा आहे. येथे अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. सध्या दिवाळीला सगळे विद्यार्थी गावाला निघाले आहेत. अशातच अलका चौकात एक घटना घडली.

एक विद्यार्थी अलका चौकातून गावाला चालला होता. पण गावाला जात असताना पोलिसांनी अडवल्यामुळे त्याची ट्रेन हुकली. ट्रेन हुकल्यानंतर त्याचा मनस्ताप अनावर झाला. त्याने थेट रस्त्यावर झोपून गोंधळ घालण्यास सुरूवात केली. पोलिसांचा निषेध करत त्याने चौकातच गोंधळ सुरू केला.

त्यानंतर चौकात लोकांची गर्दी जमा झाली होती. यवतमाळचा हा विद्यार्थी पुण्यात एमपीएससीच्या अभ्यासासाठी राहतो. त्याचे नाव राहुल आहे. तो सेना दत्त पोलिस चौकी परिसरात राहतो. राहुल त्याच्या मित्रासोबत दुचाकीवर रेल्वे स्टेशनकडे निघाला होता.

तीन वाचून पंधरा मिनीटांनी त्याची ट्रेन प्लॅटफॉर्मवरून निघणार होती. पण रेल्वे स्टेशनवर जात असताना पोलिसांनी त्याला अडवलं आणि त्याची चौकशी केली. त्याला लायसेन्स, गाडीचे पेपर सगळं विचारलं आणि त्याच्याकडं सगळं होतं. सगळी कागदपत्रे ओके होती. पण त्याच्यावर जुने चलन भरायचे बाकी होते.

त्याने आधी कोठेतरी नियम मोडल्याने त्याच्यावर ते जुने चलन बाकी होते. पोलिसांनी त्याला ते चलन भरण्यास सांगितले. चलन भरण्यास सांगितल्यानंतर दोघांकडेही तेवढे पैसे नव्हते. त्यांनी पोलिसांनी विनंती केली की, आम्ही चलन नंतर भरू. आमची ट्रेन आहे ती सुटून जाईल, आम्हाला सोडा. पण पोलिसांनी आणखी एक चलन फाडलं आणि त्याचं लायसेन्स जप्त केलं.

एवढं सगळं घडल्यानंतर त्या दोघांची ट्रेन तोपर्यंत निघून गेली होती. त्यानंतर तो विद्यार्थी चांगलाच संतापला होता. राहुल थेट रस्त्यावर झोपला आणि त्याने या घटनेचा निषेध केला. यावेळी तो म्हणाला की, मी सहा महिने घरी गेलो नव्हतो. माझी घरची परिस्थिती बिकट आहे. माझ्याकडे तिकीट खरेदीसाठी पैसे नव्हते.

पोलिसांच्या मुजोरीमुळे मी आता गावाला जाऊ शकत नाही. माझे कुटुंब आतुरतेने माझी वाट पाहत आहे. आता मी काय करू? आता मरेपर्यंत मी येथेच झोपणार आहे. दरम्यान, पोलिसांची दादागिरी येथेही दिसून आली. या घटनेनंतर पोलिसांचे डोके ठिकाणावर आले. त्यांनी त्याला स्वता रिक्षा करून दिली. तसेच त्याला एका खासजी ट्रॅव्हल्समध्ये बसवून गावाला पाठवून दिले.

महत्वाच्या बातम्या
Uddhav Thackeray : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची धडक; शिवसैनिकांनी ठाकरेंच्या भगव्याची शान राखली
Dhantrayodashi : धनत्रयोदशीच्या आधीच सोन्या चांदीच्या भावात तुफान घसरण; वाचा स्वस्त झालेले नवे दर
narayan rane : भाजपच्या घराघरात निरमा पावडरचा कारखानाच तयार झाला आहे; शिवसेनेने भाजपला पाडले उघडे
Nana patekar : ‘अशोकनं तेव्हा मला कोरा चेक दिला आणि म्हणाला…’; नाना पाटकेरांनी सांगितला ‘तो’ भावनिक किस्सा

इतर ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now