Share

शौर्याची भाषा करणारे गप्प का? ५६ इंचाची छाती चायना माल निघाला का? प्रसिद्ध गायकाची मोदींवर टीका

गलवान खोऱ्यातला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये चीनी सैनिक गलवानच्या खोऱ्यात चीनी ध्वज फडकावताना दिसून येत आहेत. या व्हिडिओमुळे केंद्रातील मोदी सरकार लोकांच्या निशाण्यावर आले आहेत. यादरम्यान बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आणि संगीतकार विशाल ददलानी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका केली आहे.

विशाल ददलानी यांनी ट्विटर हँडलवर गलवानच्या खोऱ्यातील व्हिडिओ शेअर करत लिहिले की, ‘नमस्कार नरेंद्र मोदी आणि अमित शाह. लाल डोळे राहू द्या. एकदा बोलून तरी दाखवा की, चीनने भारताच्या जमिनीवर कब्जा केली आहे. भाषणांमध्ये इतकी विरता दाखवणारे आता गप्प का आहेत? दोन चार अॅप्सवर बंदी घालणार नाही का? ५६ इंचाची छाती चायना माल निघाला का?’

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओवरून विरोधी पक्षातील नेतेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही ट्विट करत मोदींना या व्हिडिओबाबत मोदींना आपले मौन सोडण्यास सांगितले आहे. त्यांनी ट्विट करत लिहिले की, ‘गलवानवर आपलाच तिरंगा चांगला दिसतो. चीनला उत्तर द्यावे लागेल. मोदी जी मौन सोडा’.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओबाबत असे सांगितले जात आहे की, २०२२ या नववर्षाच्या पहिल्याच दिवशी चिनी सैनिकांनी गलवान खोऱ्यात चीनी झेंडा फडकावला आहे. या व्हिडिओमुळे अनेक लोक सरकारवर प्रश्न उपस्थित करत आहेत. तर दुसरीकडे अनेकजण हा व्हिडिओ जुना असल्याचा दावा करत आहेत.

अनेक लोकांचे म्हणणे आहे की, जानेवारी महिना असूनही व्हिडिओत कुठेही बर्फ दिसत नाहिये. तसेच चीनी सैनिक उन्हाळ्यातील कपड्यांत दिसून येत आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ गलवानचा नाही तर जुना आहे. चीन चुकीच्या पुराव्यांसोबत हा प्रचार करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

दारूने तंगाट असलेल्या आर्यन खानने एअरपोर्टवर केली लघवी? ‘जाणून घ्या’ व्हायरल व्हिडिओतील सत्य

.. मग फिरोज खानशी लग्न करून इंदिरा गांधींची मुलं ब्राह्मण कशी?
ज्योतिबाच्या नावानं चांगभलं! विशाल निकमने विकास पाटीलसोबत घेतले ज्योतिबाचे दर्शन, पहा फोटो
एखाद्या चित्रपटाच्या फिल्मी स्टोरीप्रमाणे ‘या’ अभिनेत्याचे कुटुंब एका रात्रीत संपले

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now