Homeताज्या बातम्याज्योतिबाच्या नावानं चांगभलं! विशाल निकमने विकास पाटीलसोबत घेतले ज्योतिबाचे दर्शन, पहा फोटो

ज्योतिबाच्या नावानं चांगभलं! विशाल निकमने विकास पाटीलसोबत घेतले ज्योतिबाचे दर्शन, पहा फोटो

‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या सीझनचा विजेता विशाल निकमने नुकतीच पंढरपुरात जाऊन विठुमाऊलींचे दर्शन घेतले होते. कीर्तनकार शिवलीला पाटील यांच्यासोबत तो विठुमाऊलीच्या दर्शनाला गेला होता. त्यानंतर आता तो ज्योतिबा आणि कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाला गेला आहे. यावेळी बिग बॉसचा स्पर्धक आणि विशालचा मित्र विकास पाटीलही त्याच्यासोबत दिसून आला.

विशालने ज्योतिबा आणि कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनादरम्यानचे काही फोटो त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्याने लिहिले की, ‘बिग बॉसमध्ये बोललो होतो भावा ही Journey सुरु झालीय आणि ही कधीच संपणार नाही! बिग बॉसच्या बाहेरचा प्रवास अंबाबाई आणि ज्योतिबाच्या दर्शनाने सुरु केलाय. चांगभलं!! ही दोस्ती तुटायची नाय!!’

दुसरीकडे विकास पाटीलनेही त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर यादरम्यानचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ते दोघे ज्योतिबाच्या मंदिरात गुलाल उधळतानाही दिसून आले. व्हिडिओ शेअर करत विकासने लिहिले की, ‘ज्योतिबाच्या नावानं चांगभलं’.

बिग बॉसच्या घरात विशाल आणि विकास चांगले मित्र बनले होते. शोदरम्यान झालेली त्यांची मैत्री शो संपल्यानंतरही कायम आहे. तर आपल्या आवडत्या जय-वीरूची जोडी पुन्हा एकत्र दिसल्याने या दोघांचे चाहतेही खूप आनंदित आहेत. त्यांच्या या पोस्टवर चाहते लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत त्यांच्याप्रती आपले प्रेम व्यक्त करत आहेत.

दरम्यान, विशाल निकम बिग बॉस शो संपल्यानंतर त्याच्या गावी पोहोचला. यादरम्यानचा एक व्हिडिओ शेअर करत त्याने त्याच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याचे सांगितले आहे. व्हिडिओ शेअर करत त्याने लिहिले की, ‘ज्या गावाच्या मातीमध्ये, ज्या ठिकाणी तुमचा हा रांगडा गडी, Maharashtra’s Most Desirable Man #DesiBoy विशाल निकम घडला तिथे १०० दिवसांनी आल्यानंतर जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. It Doesen’t matter where you came from, all that matters is where you are going’.

महत्त्वाच्या बातम्या :

आपल्याच धर्मातील लोकांवर भडकली उर्फी जावेद; म्हणाली, पुरूष लग्नाच्या आधी महिलांना..

‘माय परफेक्ट वाईफ’ म्हणत रितेश देशमुखने शेअर केला जेनेलियाचा मजेशीर व्हिडीओ
VIDEO: बिग बॉस विनर विशाल निकमने दिलेले वचन केले पुर्ण, शिवलीला पाटील यांची भेट घेत म्हणाला..
‘शमिताला वोट करा यावेळी ती जिंकलीच पाहिजे’, शिल्पा शेट्टीचा ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल