बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आणि संगीतकार विशाल ददलानी यांचे वडिल मोती ददलानी यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यासंदर्भात स्वतः विशाल यांनी सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे. तसेच विशाल स्वतः कोरोना संक्रमित असल्याने वडिलांना शेवटच्या क्षणीही पाहू न शकल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
विशाल यांनी त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर त्यांच्या वडिलांचा एक फोटो शेअर करत भावूक पोस्ट लिहिली. त्यांनी लिहिले की, ‘माझा सर्वात चांगला मित्र आणि या पृथ्वीवरील सर्वात उत्तम आणि प्रामाणिक व्यक्तीला मी काल गमावलो. मला त्यांच्यापेक्षा उत्तम पिता, व्यक्ती किंवा त्यांच्यापेक्षा उत्तम शिक्षक मला या आयुष्यात सापडला नसता. माझ्यात जे काही चांगले आहे ते त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा थोडासा प्रतिबिंब आहे’.
त्यांनी पुढे लिहिले की, ‘मागील तीन-चार दिवसापासून ते आयसीयुमध्ये होते. परंतु मी त्यांना भेटण्यासाठी जाऊ शकलो नाही. कारण माझी कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह आली होती. तसेच माझ्या आईच्या अत्यंत कठिण प्रसंगातही मी तिला सावरण्यासाठीही जाऊ शकत नाही. हे अजिबात योग्य नाही’.
पोस्टमध्ये पुढे विशाल यांनी म्हटले की, ‘देवाच्या कृपेने माझी बहिण खूप हिम्मतीने या कठिण प्रसंगातील सर्व परिस्थिती सांभाळत आहे. पण मला माहित नाही की, मी माझ्या वडिलांशिवाय या जगात कसा राहू शकेन. मी पूर्णपणे खचलो आहे’, असे म्हणत विशाल यांनी या पोस्टद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, विशाल ददलानी यांनी शुक्रवारी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. तसेच त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना कोरोना चाचणी करून घेण्याचे आणि काळजी घेण्याचेही आवाहन केले होते. तर सध्या विशाल स्वतःला क्वारंटाईन करून घेतले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
मारण्याची धमकी देणाऱ्या महीलांना दुकानदाराने चोपले, प्रत्येक पुरूष मार खात नसतो; व्हिडीओ व्हायरल
‘मकडी’ चित्रपटातील ‘ही’ बालकलाकार अडकली होती सेक्स रॅकेटमध्ये; जेलमधून बाहेर आल्यानंतर म्हणाली…
रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तींवर वळूचा हल्ला, वळूने धडक मारून दोन जणांना केले जखमी, पहा व्हिडीओ






