Homeइतरमारण्याची धमकी देणाऱ्या महीलांना दुकानदाराने चोपले, प्रत्येक पुरूष मार खात नसतो; व्हिडीओ...

मारण्याची धमकी देणाऱ्या महीलांना दुकानदाराने चोपले, प्रत्येक पुरूष मार खात नसतो; व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर लखनऊ गर्लचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. लखनऊ गर्लने एका कॅब ड्रायव्हरला खुप मारहाण केली होती. त्याचा तो व्हिडिओ होता. त्यावेळी कॅब ड्रायव्हर मुकाट्याने मार खाताना दिसून येत होता.

कॅब ड्रायव्हरला मारल्यामुळे सोशल मीडियावर लखनऊ गर्ल चांगलीच चर्चेत आली होती. त्यावेळी नेटकऱ्यांनी तिच्यावर संताप व्यक्त केला होता. तर अनेकांनी कॅब ड्रायव्हरने त्या महिलेवर हात उचलायला पाहिजे होता, असेही म्हटले होते. पण सध्या जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्याने एकच खळबळ उडाली आहे.

दोन महिला एका कपड्याच्या दुकानाबाहेर दिसून येत आहे. कोणत्या तरी कारणामुळे त्या दुकानदारासोबत वाद घालताना दिसत आहे. हा त्यांचा वाद इतका टोकाला जातो की त्या महिला हातात काठी घेऊन महिला त्या दुकानदाराला मारायला जाते. पण त्यानंतर जे घडलं आहे, ते खुपच हैराण करुन टाकणार आहे.

दोन्ही महिला आधी त्यांना मारण्याची धमकी देत असतात. त्यानंतर दुकानदार म्हणतो की हिंमत असले तर मारुन दाखव. त्यानंतर ती त्या माणसाला दोन तीन वेळा काठीने मारत, त्यावेळी तो व्यक्ती खुपच संतापून जातो आणि तिलाच मारहाण करायला सुरुवात करतो.

तो व्यक्ती आधी त्या महिलेच्या कानशिलात लावतो. त्यानंतर तिची मान धरुन तिच्या पाठीवर मारहाण करतो. ती महिला त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण तो इतका रागत असतो की तो हाही विचार नाही, करत की ती एक महिला आहे. तो अमानुषपणे मारहाण करताना दिसून येत आहे.

त्यानंतर त्या महिलेसोबत असलेल्या एका दुसऱ्या महिलेलाही एक जण मारहाण करण्यास सुरुवात करतो. तो तिच्या केसांना धरुन मारहाण करताना दिसून येत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडिया प्रचंड व्हायरल होत आहे. प्रत्येक पुरुष हा कॅब ड्रायव्हरसारखा साधा माणूस नसतो, असे कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या-
‘मकडी’ चित्रपटातील ‘ही’ बालकलाकार अडकली होती सेक्स रॅकेटमध्ये; जेलमधून बाहेर आल्यानंतर म्हणाली…
मुलाचे चित्रपट कमवतात ४०० कोटी परंतु वडील आजही चालवितात बस; जाणून घ्या कारण
११ वर्षांच्या चिमुकलीने दिला बाळाला जन्म; आईवडिलांसह डॉक्टरांनाही बसला धक्का
आता नोटीसयुद्ध! विद्या चव्हानांना अब्रूनुकसानीची नोटीस दिल्यावर ठाकरे सरकारकडून फडणवीसांना ‘त्या’ प्रकरणात नोटीस