Share

शिवसेनेने आमचा विश्वासघात केला, त्याचे परिणाम तो पक्ष भोगतोय… भाजपचा नितीश कुमारांना इशारा

बिहारमध्ये जेडीयू-भाजप युतीचे सरकार होते. मात्र मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एनडीएतून बाहेर पडत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर भाजपची साथ सोडणाऱ्या नितीश कुमार यांना भाजपचे राज्यसभा खासदार सुशील मोदी यांनी कडवा इशारा दिला आहे. ( BJP’s warning to Nitish Kumar)

‘शिवसेनेने आमच्यासोबत विश्वासघात केला. त्याचे परिणाम आज तो पक्ष भोगतोय,’ असं सुशील मोदी यांनी म्हंटलं आहे. सुशील मोदी जणू नितीश कुमार यांना तुमची पण तीच अवस्था होईल, अशा अर्थाने इशारा देत असल्याचे दिसते.

सुशील मोदी पुढे म्हणाले की, ‘नितीश कुमार यांना राजदसोबत असताना जो मान नव्हता. तो आम्ही त्यांना दिला. आमचे संख्याबळ जास्त असतानाही त्यांना मुख्यमंत्री बनवले. आम्ही कधी त्यांचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला नाही.’

पुढे ते असंही म्हणाले की, ‘ज्यांनी आमचा विश्वासघात केला त्यांनाच आम्ही तोडलं. महाराष्ट्रात शिवसेनेने आमच्यासोबत विश्वासघात केला. त्याचे परिणाम आज तो पक्ष भोगत आहे.’ अशाप्रकारे भाजप खासदार सुशील मोदी बोलल्यामुळे त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

दरम्यान नितीश कुमार यांनी भाजपसोबत असलेल्या सरकारमधून बाहेर पडत राजीनामा दिला. आता ते राजदसोबत आघाडी करून नवे सरकार स्थापन करणार आहेत. त्यासाठी उद्या राज्यपालांची भेट घेऊन ते सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत.

बिहारमध्ये आता नव्याने स्थापन होणाऱ्या सरकारचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी देखील उद्याच होईल, असे बोलले जाते. नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडून मोठे धाडस दाखवले. मात्र त्यानंतर याचे काय परिणाम बिहारच्या राजकारणावर होतील? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

महत्वाच्या बातम्या-
राष्ट्रवादीत होते तेव्हा बैलगाडीभरून पुरावे देत भ्रष्टाचाराचे आरोप; भाजपमध्ये प्रवेश करताच केलं मंत्री
मलईदार खाते तर दूरच, साधे मंत्रीपदही मिळाले नाही; बच्चू कडूंनी व्यक्त केली नाराजी
शिंदे सरकारमधील ‘या’ ६ मंत्र्यांनी आत्तापर्यंत बदललेत २ ते ३ वेळा पक्ष, वाचा त्यांची फिरती निष्ठा

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now