गुरुवारी पाच राज्यांचे निवडणूक निकाल हाती आले. या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर, उत्तराखंड आणि पंजाब या राज्यांचा समावेश होता. यापैकी चार राज्यात भाजपाला मोठे यश मिळाले आहे. तर पंजाबमध्ये काँग्रेसला धक्का देत आपने बाजी मारली आहे. चार राज्यात भाजपाला यश मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
तर दुसरीकडे पंजाबमध्ये आम आदमी पक्षानं इतर पक्षांचा सुपडासाफ केला आहे. मात्र या निवडणुकीत समाजवादी पक्षाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे सध्या पक्षात चिंतेचे वातावरण वातावरण पसरले आहे. या निकालानंतर समाजवादी पार्टीचे सुप्रीमो यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उप्र की जनता को हमारी सीटें ढाई गुनी व मत प्रतिशत डेढ़ गुना बढ़ाने के लिए हार्दिक धन्यवाद!
हमने दिखा दिया है कि भाजपा की सीटों को घटाया जा सकता है। भाजपा का ये घटाव निरंतर जारी रहेगा।आधे से ज़्यादा भ्रम और छलावा दूर हो गया है बाकी कुछ दिनों में हो जाएगा।
जनहित का संघर्ष जीतेगा!
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) March 11, 2022
याबाबत त्यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. ‘भाजपची ही घसरण सातत्याने सुरू राहणार. अर्ध्याहून अधिक संभ्रम आणि भ्रम दूर झाला, उर्वरित काही दिवसांत होईल. जनहिताचा लढा जिंकेल!’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच या निवडणुकीत भाजपने सलग दुसऱ्यांदा सत्तेत पुनरागमन होण्याचा मान मिळवला.
या निकणूकीत भाजपने 273 जागा जिंकल्या. तर, राज्यातील प्रमुख विरोधी समाजवादी पक्षाने (SP) 125 जागा जिंकल्या. याबाबत ट्विट मध्ये अखिलेश यादव म्हणतात, ‘आमच्या जागा अडीच पट आणि मतदानाची टक्केवारी दीड पट वाढवल्याबद्दल उत्तर प्रदेशातील जनतेचे मनःपूर्वक आभार! भाजपच्या जागा कमी होऊ शकतात, हे आम्ही दाखवून दिले आहे.’
याचबरोबर भाजपची ही घसरण सातत्याने सुरू राहणार. अर्ध्याहून अधिक संभ्रम आणि भ्रम दूर झाला, उर्वरित काही दिवसांत होईल. जनहिताचा लढा जिंकेल!’ असे त्यांनी म्हंटले आहे. दरम्यान, पराभव जिव्हारी लागल्याने सपा नेत्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.
या निवडणुकीत कानपूरमधून समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र सिंह ऊर्फ पिंटू यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. पराभव जिव्हारी लागल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. राज्यात पुन्हा भाजपचे सरकार आल्याने दु:खी आणि हताश होऊन हे पाऊल उचलण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
निकाल जाहीर झाल्यानंतर नरेंद्र सिंह ऊर्फ पिंटू यांनी आत्मदहनासाठी स्वतःला आग लावली. यावेळी त्यांच्यावर पोलिसांची नजर गेली. पोलिसांनी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. ते ४० टक्के भाजल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
भाजप पुन्हा सत्तेत आल्याने सपा नेत्याचा उचलले टोकाचे पाऊल; राजकीय वर्तुळात उडाली खळबळ
शिवरायांवरील चित्रपट हा माझा ड्रिम प्रोजेक्ट; पण आहेत ‘या’ अडचणी; नागराज मंजूळेंचा खुलासा
कोणत्याही क्षणी ठाकरे सरकार कोसळणार, काॅंग्रेस खासदाराचा गौप्यस्फोट; कारणही सांगीतले
गरीबांना रेशन, योगींचे शासन अन् मोदींचे भाषण; वाचा काय होते उत्तर प्रदेशात विजय मिळवण्याचे भाजपचे समीकरण