Aam Aadmi Party: दिल्लीमध्ये दारू विक्री धोरण घोटाळ्याबाबत आप सरकारचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांची सीबीआयकडून कसून चौकशी सुरू आहे. मात्र आपमधील आमदारांनी भाजपचा हा मोठा डाव असून आप पक्षाला फोडण्याचा हा प्रयत्न आहे, असे सांगितले. आप पक्ष सोडून भाजपमध्ये येण्यासाठी भाजपने २० कोटींची ऑफर दिल्याचा धक्कादायक खुलासा आपच्या खासदाराने केला.
आपचे खासदार संजय सिंह यांनी ४ आमदारांना सोबत घेऊन भाजपवर गंभीर आरोप केला आहे. भाजपनं आम आदमी पार्टीच्या ४ आमदारांशी संपर्क साधून आमच्या पक्षात आला तर, २० कोटी देऊ, अशी ऑफर दिली, ही माहिती यावेळी संजय सिंह यांनी दिली.
आम आदमी पार्टीचे आमदार संजीव झा, सोमनाथ भारती, कुलदीप आणि अजय दत्त या आमदारांचा यात समावेश आहे. या आमदारांनी असे म्हंटले की, ‘पक्ष सोडून भाजपमध्ये आला तर २० कोटी आणि इतर नेत्याला घेऊन आला तर २५ कोटींची ऑफर आम्हाला भाजपकडून मिळाली.’
आमदारांना भाजपकडून काय ऑफर मिळाली? याबाबत खासदार संजय सिंह यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यासोबत त्यांनी पक्ष सोडून आला नाही तर ईडी, सीबीआयच्या चौकशीचा ससेमीरा तुमच्या पाठीमागे लावू, अशी धमकी भाजपने या आमदारांना दिली आहे, असं सिंह यांनी सांगितलं.
पत्रकार परिषदेत पुढे बोलताना आम आदमी पार्टीच्या आपल्या ४ आमदारांना २० कोटींची ऑफर भाजपने दिली. याचे रेकॉर्डिंग आपल्याकडे असल्याचा दावा संजय सिंह यांनी यावेळी केला. मागील काही काळापासून भाजप सातत्याने दिल्लीतील सरकार पाडण्याचा, आपच्या आमदारांना खरेदी करण्याचा, भाजपमध्ये घेण्याचा प्रयत्न करत आहे, असे ते म्हणाले.
दिल्ली सरकारच्या दारू विक्री धोरणाच्या घोटाळ्यामुळे आप सरकारचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर सीबीआयने कारवाई केली. सिसोदियांनी घेतलेल्या निर्णयामुळे कोरोना काळात फक्त सरकारी दुकानांमध्येच दारू विक्री होत होती. त्यामुळे सरकारला मोठा आर्थिक तोटा झाला. यासंबंधी दिल्लीच्या उपराज्यपालांनी तक्रार करताच ही कारवाई झाली. या पार्श्वभूमीवर आता आपच्या आमदारांना मिळालेल्या या ऑफरमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.
महत्वाच्या बातम्या-
Deepak Kesarkar : ‘५० खोके काय ५० रुपये जरी घेतले असतील तर राजीनामा देईल’, केसरकरांचे विरोधकांना प्रत्यु्त्तर
Udhhav Thackeray : लवकरच स्वत: महाराष्ट्र पिंजून काढणार अन्.., विरोधकांना इशारा देत उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा
Optical illusions: ‘या’ फोटोमध्ये दडला आहे एक चेहरा, फक्त ३०% लोकांना ३० सेकंदात देता आलंय योग्य उत्तर