नगर पंचायत निवडणुकीत भाजपने बीड जिल्ह्यात झेंडा रोवला आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच पैकी तीन नगर पंचायती आमदार सुरेश धस यांनी मोठ्या फरकाने जिंकल्या आहेत. केवळ वडवणी नगर पंचायतीमध्ये राष्ट्रवादीने झेंडा रोवला आहे.
राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके हे भाजपच्या विरोधात प्रबळ दावेदार होते. प्रतिष्ठितांना धक्का देत निर्णायक निकाल हाती लागला आहे. आष्टी, पाटोदा, शिरूर, नगरपंचायतमध्ये भाजपने एकतर्फी विजय मिळवला आहे. भाजपच्या विजयाने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
पालकमंत्री धनंजय मुडेंना हा मोठा धक्का समजला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पंकजा मुंडेंनी बाजी मारली आहे. काँग्रेसच्या राज्यसभेच्या खासदार रजनीताई पाटील यांनाही पराभव पत्करावा लागला आहे. केज नगरपंचायतीमध्ये काँग्रेसच्या ताब्यातील नगरपंचायत जनविकास आघाडीच्या ताब्यात गेली आहे.
दुसरीकडे पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय भाजपाचे ज्येष्ठ नेते राजू भाऊ मुंडे यांच्या ताब्यातील वडवणी नगरपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात गेल्यामुळे भाजपलाही धक्का बसला आहे. निवडणुक निकालानंतर पंकजा मुंडेंनी पत्रकार परिषद घेतली आणि धनंजय मुंडेंना टोला लगावला. पंकजा मुंडे म्हणाल्या की, सत्ता असूनही यश मिळवणं कठीण झालंय.
भाजपला लोकांनी चांगली साथ दिली आहे. बीडमध्ये सर्व नगरपंचायतींमध्ये भाजपचे वर्चस्व आहे. विजयी उमेदवारांचे अभिनंदन. बीडमध्ये जसं तुम्ही म्हणतायत तशी लढत नव्हती, बीड जिल्ह्याच्या गेल्या अडीच वर्षातील लोकांचा रोष आणि अपेक्षांचे निकाल आहेत.
दरम्यान, शिवसेनेला बीडमध्ये दोनच जागा जिंकता आल्या. नुतन शिवसेना जिल्हा प्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्या कार्यक्षेत्रातील व वणीत उभारलेले सहाही शिवसेना उमेदवारांचा दारूण पराभव झाला आहे. याशिवाय पाच उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले आहे. या मतदार संघाचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांनाही कुठलाच कारनामा करता आला नाही.
महत्वाच्या बातम्या
मृत्युुच्या आधी आजोबांनी असा कानमंत्र दिला की नातू झाला थेट कलेक्टर, वाचा यशोगाथा
कौतुकास्पद! बहिणीने टेलरिंगचे काम करून भावाला शिकवले, भावाने कलेक्टर होऊन नाव कमावले
‘’महाविकास आघाडीने धनशक्ती, दंडशक्तीचा कितीही वापर केला तरीही भाजपच एक नंबर’’
‘विराटने लॉकडाऊनमध्ये फक्त अनुष्काच्या बॉलिंगचा सराव केला’, गावसकरांच्या वक्तव्याने खळबळ उडाली होती