Share

Bhajpa: भाजप महाराष्ट्रातील आणखी एक मित्रपक्ष संपवणार? सहकारी पक्षाचा एकमेव आमदार फोडण्याच्या हालचाली

devendra fadanvis

(Bhajpa): राज्यातील राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठानच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिव्यांगांना साहित्य वाटप सोहळा त्यासोबतच गौरी गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरणाचे आयोजनही १५ सप्टेंबरला करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्त्याने बॅनर लावण्यात आले होते.

हे बॅनर गंगाखेड शहरात लावण्यात आले होते. त्याची चर्चा जोरदार सुरू आहे. गुट्टे यांच्या बॅनरवरून राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक महादेव जानकार गायब झाल्याचे दिसून आले आहे. महादेव जानकार यांचा फोटो बॅनर मधून वगळण्यात आला याचे नेमके कारण काय? अशा चर्चांना उधाण आले होते. रत्नाकर गुट्टे भाजपच्या वाटेवर तर नाही ना? असाही प्रश्न उपस्थित झाला होता.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. बॅनरवरही त्यांचाच फोटो होता. अमृता फडणवीस यांच्यासोबतच नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हाधिकारी आचल गोयल व अन्य मंडळी उपस्थित होते. गंगाखेड शहरात हा कार्यक्रम आमदार रत्नाकर गुट्टे यांनी आयोजित केला होता.

त्याचे बॅनरही शहरात लावण्यात आले. मात्र रत्नाकर गुट्टे ज्या पक्षातून निवडून विधानसभेवर गेले, त्या पक्षाचे संस्थापक महादेव जाणकार यांचा फोटो बॅनरवर लावलेला नाही. त्यामुळे ज्या पक्षातून मोठे झाले त्याच पक्षाला विसरले की काय?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सर्वत्र या चर्चेला उधाण आले होते. रत्नाकर गुट्टे राष्ट्रीय समाज पक्षातील राज्यातील एकमेव आमदार आहे.

आमदार रत्नाकर गुट्टे यांना शेतकऱ्यांच्या नावावर कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेतल्याप्रकरणी २०१९ मध्ये अटक झाली होती. न्यायालयीन कोठडीत असलेले आमदार रत्नाकर गुट्टे यांनी २०१९ ची गंगाखेड विधानसभा निवडणूक तुरुंगातून लढवली आणि जिंकली. २६ मार्च २०१९ रोजी रत्नाकर गुट्टे यांना सीआयडी पथकाने औरंगाबाद येथे अटक करून गंगाखेड येथील ट्रायल कोर्टात हजर केले होते.

महत्वाच्या बातम्या
राष्ट्रवादीने पुन्हा केला काँग्रेसचा विश्वासघात; सांगलीत काँग्रेस उमेदवाराला पाडून भाजपला जिंकवले 
गंगेच्या किनारी राहणारा सुर्या कसा बनला मुंबईचा सुपरस्टार? अजूनही युपीच्या ‘या’ गावात राहते कुटुंब
Foxconn : ‘फॉक्सकॉनपेक्षा मोठा प्रकल्प देतो’ PM मोदींचा CM शिंदेना शब्द; वाचा नेमकी काय चर्चा झाली..
शेतकऱ्याची आईवडिलांनी अनोखी श्रद्धांजली, भाताच्या शेतात तयार केला आईवडिलांचा फोटो

राज्य इतर ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now