राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांनी मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापसून भाजप – शिवसेनेमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. अशातच राज्यातील सरकार पाडण्यासाठी सक्तवसुली दबाव टाकण्यात येत असल्याचा दावा करणारं पत्र शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी व्यंकय्या नायडूंना लिहिलं. (bjp will form government in maharashtra 10th march)
राऊत यांनी या पत्रातून भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला. याचाच धागा पकडत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी भाष्य केले आहे. कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पाटील म्हणाले, ‘राज्यात १० मार्चनंतर भाजप सरकार येणार.’
पाटील यांच्या या विधानाने अनेकांच्या भुवया उचवल्या. कार्यकर्त्यांशी संवाद साधून झाल्यानंतर पत्रकरांनी याबाबत पाटील यांना विचारले असता पाटील यांनी सारवासारव केली. कार्यकर्त्यांचं मन राखण्यासाठी आपण तसं बोललो असल्याच पाटील यांनी स्पष्ट केले.
माध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले, ‘कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. सत्तेचा दुरुपयोग सुरू आहे. किरीट सोमय्यांवर हल्ला झाला. या परिस्थितीत कार्यकर्त्यांचं मनोधैर्य उंचावण्यासाठी १० मार्चनंतर राज्यात भाजपचं सरकार येईल, असं म्हणालो,’ असं पाटील यांनी यावेळी सांगितले.
पुढे बोलताना पाटील म्हणाले, ‘सत्तेचा गैरवापर सुरू असल्याचा त्रास तळागाळातील कार्यकर्त्यांना होतो. त्यांनी त्यांची काळजी माझ्याकडे व्यक्त केली. तेव्हा १० मार्चला उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर आपलं सरकार येईल, असं मी कार्यकर्त्यांना सांगितलं.’
दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज लेटर बॉम्ब टाकला आहे. थेट उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून राऊत यांनी ईडी आणि भाजपचे वाभाडे काढले आहेत. तसेच या पत्रातून महाराष्ट्रातील ठाकरे सरकार पाडण्यासाठी सुरू असलेल्या षडयंत्राची माहितीही देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
पुन्हा एकदा सबाचा हात पकडताना दिसला ह्रतिक रोशन; कॅमेरा पाहताच लपवले तोंड, पहा व्हिडिओ
राऊतांच्या आरोपांवर फडणवीसांचं प्रत्युत्तर म्हणाले, ‘सिंह कधी गिधाडाच्या धमकीला घाबरत नाही’
पहले हिजाब, फिर किताब; हिजाब प्रकरणावरून महाराष्ट्रातील मुस्लिम तरूणांची बॅनरबाजी, म्हणाले..
‘मी खोटा असतो तर एवढा खवून आन् उचकून लढलो नसतो भावानों’, किरण मानेंची आणखी एक पोस्ट चर्चेत