Share

खडसेंना चारी मुंड्या चीत करायला भाजपने आखला ‘असा’ डाव; राजकीय समीकरण बदलणार

eknath khadse

विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेकडून एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. खडसे या निवडणुकीत नक्कीच बाजी मारतील, असा विश्वास त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला. मात्र भाजपने खडसे यांच्या पराभवासाठी प्लॅन आखला असल्याच बोललं जातं आहे.

राज्यसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालानंतर आता विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीपुढे सहाही जागा जिंकण्याचे आव्हान आहे.या निवडणुकीत ‘अकरावा’ म्हणजे पराभूत होणारा उमेदवार कोण असेल याचीच उत्सुकता आहे. आज सकाळी 9 वाजता राज्याच्या विधान परिषदेच्या १० जागांसाठीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे.

एक – एक मत या निवडणुकीत सर्वच पक्षांना महत्त्वाच आहे. आपला उमेदवार निवडून यावा म्हणून प्रत्येक मताचं योग्य गणित बसवण्याचे नियोजन राजकीय पक्षांनी केलं आहे. तर दुसरीकडे खडसेंना पराभूत करण्याचं आमचं नियोजन आहे, असा असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंच्या पराभवासाठी काही डावपेच आखल्याची देखील माहिती एका भाजप आमदाराने खासगीत बोलताना एका मराठी वृत्तवाहिनीला दिल्याची माहिती मिळत आहे. तर जाणून घ्या.. ‘कसा’ होऊ शकतो एकनाथ खडसे यांचा या निवडणुकीत पराभव..?

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे ५३ आमदार आहेत. रामराजे नाईक निंबाळकर निवडून गेल्यानंतर २६ मतं शिल्लक राहतात. तर दुसरीकडे गुप्त मतदान पद्धती असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसची मतं फुटली तर खडसेंना याचा मोठा धक्का या निवडणुकीत बसू शकतो. असं झाल्यास खडसे यांना पराभवाचा सामना करावा लागेल.

तर दुसरीकडे खडसे यांनी महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला. मतदानाच्याच दिवशी “भाजपाचे अनेक आमदार माझ्या संपर्कात आहेत. पण पक्षाला सोडून मला मतदान करतील अशी परिस्थिती नाही”, असं मोठं विधान एकनाथ खडसे यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या
करुणा शर्मा यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, जातीवाचक शिवीगाळ आणि नैसर्गिक अत्याचार केल्याचा आरोप
विधान परिषद निवडणुकीत देखील फडणवीसांचा करिश्मा! मविआतील पहिला आमदार फुटला?
‘मिल्ट्रीत जाणारा वाघ पैशांसाठी जात नाय, तो कुठल्या भावनेनं तिथं जातो हे तुझ्या डोक्याबाहेरचं’
अखेर सदाभाऊकडून भांडाफोड! ‘तो’ हॉटेलवाला राष्ट्रवादीचा कार्यकर्ता; पुरावा केला सादर

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now