गेल्या काही दिवसांपासून भाजपाचे खासदार सुब्रहमण्यम स्वामी (BJP Subramanian Swamy) हे मोदी सरकारवर जहरी शब्दात टीका करत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी दररोज वाढणाऱ्या इंधनदरवाढीमुळे पक्षाला घरचा आहेर दिला होता. आता पुन्हा एकदा त्यांनी मोदी सरकारला लक्ष केले आहे.
आता सुब्रहमण्यम स्वामी यांनी थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. आर्थिक विकासाच्या मुद्द्यावरून त्यांनी पंतप्रधान मोदींसोबतच केंद्र सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. तसेच राष्ट्रीय सुरक्षेबाबतही त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे.
याबाबत सुब्रहमण्यम स्वामी यांनी ट्विट केले आहे. ‘आर्थिक प्रगतीचं लक्ष्य गाठण्यास गेल्या 8 वर्षात नरेंद्र मोदी अपयशी ठरले असल्याची टीका त्यांनी ट्विटमधून केली आहे. सध्या सुब्रहमण्यम यांच्या ट्विटची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. यावर भाजप नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
वाचा काय आहे सुब्रहमण्यम स्वामी यांचे ट्विट.. ट्विटमध्ये सुब्रहमण्यम स्वामी म्हणतात, “आर्थिक प्रगतीचं लक्ष्य गाठण्यास गेल्या 8 वर्षात नरेंद्र मोदी अपयशी ठरल्याचं आपण पाहिलं आहे. तसेच 2016 पासून आर्थिक विकास दर सातत्याने घसरत आहे, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी इंधनदरवाढीवरून सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या पक्षाला घरचा आहेर दिला होता. मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर त्यांनी जोरदार टीका केली होती. “पेट्रोल, डिझेल आणि केरोसीनच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने देशात बंडखोरीची परिस्थिती निर्माण होत आहे. हे करणे ही अर्थ मंत्रालयाची बौद्धिक दिवाळखोरी आहे. हे देशविरोधीही आहे. या किमती वाढवून अर्थसंकल्पीय तूट भरून काढणे ही निव्वळ अक्षमता आहे.’