सध्या राजकीय वर्तुळात आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. त्यात आज सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे एकनाथ शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे बंडखोर शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी एक खळबळजनक विधान केलं आहे.
माध्यमांशी बोलताना केसरकर यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक सल्ला दिला आहे. ‘मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं,’ असा सल्ला केसरकर यांनी दिला आहे. यामुळे आता उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.
यावेळी बोलताना केसरकर यांनी म्हंटलं आहे की, ‘आमच्या पक्षाचे नेते उद्धव ठाकरेच असून कोणीही मातोश्रीवर आरोप करु नयेत. महाराष्ट्रात लवकरच भाजप-सेनेचं सरकार येणार असल्याचा विश्वास केसरकरांनी व्यक्त केला आहे. यामुळे आता नक्की राज्यात कोणत सरकार येणार? हे पाहणे महत्त्वाच ठरणार आहे.
खरच उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपसोबत पुन्हा सत्तेत बसणार का? अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. केसरकर यांनी भाजप – शिवसेनेच्या सत्तेबाबत केलेले व्यक्तव्य आता राजकीय वर्तुळात आणखीनच खळबळ उडवून देणार ठरलं आहे.
दरम्यान, पुढ बोलताना केसकर यांनी म्हंटलं आहे की, राष्ट्रवादीतील काहीजण हे उद्धव ठाकरेंचे सल्लागार आहेत. त्याचबरोबर ठाकरेंना राष्ट्रवादीतील सल्लागार महत्वाचे वाटतात. आधी मार्ग काढला असता, तर मविआ सरकार टिकलं असतं, असं केसकर यांनी स्पष्टच सांगितलं.
याचबरोबर एकनाथ शिंदे हेच गटनेते असल्याचंही त्यांनी बोलताना स्पष्ट केलं आहे. सध्या राजकीय वर्तुळात सत्तास्थापनेबद्दल अनेक राजकीय नेत्यांकडून वक्तव्य करण्यात येत आहेत. मात्र येणाऱ्या काही दिवसांमध्येच सत्ता स्थापनेबद्दलच चित्र स्पष्ट होईल.
महत्वाच्या बातम्या
‘साहेब तुम्ही विजयी व्हावेत!,’ मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटलांचा एकनाथ शिदेंना जाहीर पाठिंबा
लग्नानंतर दोन महीन्यातच आलिया भट आणि रणबीर कपूर बनणार आईवडील, गुड न्युज शेअर करत म्हणाले…..
शिवसैनिक आणि बंडखोर आमदाराच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा, कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची