Share

bjp : रात्रीत ५० आमदार गुवाहाटीला पोहचतात, मग गरीबांचा शिधा पोहचायला उशीर का?, भाजप मंत्री म्हणाले…

bjp

bjp : दिवाळी अगदीच तोंडावर आली आहे. सर्व नागरिक दिवाळीच्या तयारीला लागले आहे. सर्वसामान्य नगरिकांपासून अगदी नेत्यांपर्यंत सगळेच कामाला लागले आहेत. तर दुसरीकडे शिंदे – फडणवीस सरकारने दिवाळीच्या तोंडावर एक मोठी घोषणा केली आहे. त्यावरुन सध्या राजकारण रंगले आहे.

नुकतीच शिंदे – फडणवीस सरकारने राज्यात शिधाधारकांना १०० रुपयांमध्ये दिवाळी फराळासाठी चार वस्तू देण्याची घोषणा केली. मात्र असं असलं तरी देखील दिवाळी तोंडावर येऊनही अद्याप अनेक जिल्ह्यांमध्ये या वस्तू वितरणासाठी पोहचल्या नसल्याचं बोललं जातं आहे.

विशेष बाब म्हणजे याबाबत अनेक तक्रारी येत आहेत. याच मुद्याला धरून भाजप नेत्यांवर जोरदार निशाणा साधला जात आहे. “एका रात्रीत ५० आमदार गुजरातहून गुवाहाटीला पोहचतात, मग शिधा पोहचायला उशीर का?” असा सवाल सध्या उपस्थित केला जातं आहे.

यावर आता भाजप नेते राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिले आहे. माध्यमांशी बोलताना टयांनी म्हंटलं आहे की, रात्रीत ५० आमदार गुजरातहून गुवाहाटीला पोहचू शकतात, पण दिवाळीच्या आधी फराळ होणं गरजेचं आहे तो पोहचायला चार ते पाच दिवस लागतात. हा विरोधाभास नाही का?, असा प्रतीसवाल टयांनी उपस्थित केला.

पुढे बोलताना चव्हाण यांनी म्हंटलं आहे की, “जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे यातील किमान ५० टक्के वस्तू पोहचतील यासाठी आम्ही शासन म्हणून पूर्ण ताकद लावली आहे. आज रात्रीपर्यंत सर्व ठिकाणी शिधा पोहचेल,” असा विश्वास चव्हाण यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केला आहे.

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now