Share

भाजपने आयोजित केलेल्या पोलखोल सभेच्या स्टेजची आणि रथाची शिवसैनिकांकडून तोडफोड; फडणवीस आक्रमक

fadanvis

सध्या आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि विरोध पक्ष भाजपामध्ये जोरदार आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. तर दुसरीकडे भाजपाने बीएमसीवर भ्रष्टाचाराचा आरोप करत त्याविरोधात पोलखोल यात्रेची सुरुवात केली.

पण, त्यापूर्वीच शिवसैनिकांनी राडा घालत पोलखोल सभेच्या स्टेजची आणि रथाची तोडफोड केली. यावरून आता चांगलेच राजकारण तापलं आहे. आज भाजपने मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची पोल खोल करण्यासाठी या सभेचं आयोजन केलं आहे. त्यासाठी स्टेज बांधण्याचं काम सुरु असतानाच शिवसैनिक तिथे दाखल झाले.

आक्रमक शिवसैनिकांनी स्टेजची तोडफोड केली. रात्री एकच्या सुमारास ही घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. तसेच शिवसैनिकांनी मध्य रात्रीपासून भाजपच्या सभेचं स्टेज बांधण्याचं काम थांबवून ठेवलं. त्यामुळे तिथं पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

तसेच भाजपने कांदिवली येथे मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यासाठी सभेचे आयोजन केले आहे. कांदिवली पूर्वमध्ये रेल्वे स्टेशनच्या समोर संध्याकाळी 7 वाजता ही सभा होणार आहे. त्यासाठी मध्यरात्रीपासूनच स्टेज बांधण्याचे काम सुरू होते. मात्र शिवसैनिकांनी स्टेजची तोडफोड केली.

दरम्यान, आक्रमक शिवसैनिकांनी व्यासपीठाची तोडफोड केल्यानंतर आता सभा होणार का? स्टेज पुन्हा उभारण्यात येणार आहे का? असे सवाल सध्या उपस्थित झाले आहेत. या प्रकारावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

“आमच्या पोलखोल यात्रेच्या बसवर दगडफेक होणं अपेक्षितच आहे. ज्याप्रकारे यांचा बुर्खा फाटतो आहे, यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल होतेय. पहिल्या सभेनंतर हे सगळे हादरले आहेत. त्यातूनच ते असा प्रयत्न करत आहेत, पण त्यांनी काहीही केलं तरी यात्रा थांबणार नाही,” असे फडणवीस म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या
गणेश नाईकांची DNA चाचणी करा, माझ्या मुलाला वडिलांचं नाव द्या; पीडित महिलेने केली मागणी
..तर शेकडो मुस्लिम महिला मंदिरासमोर बसून कुराण वाचतील, सपा महिला नेत्याचा इशारा
चहलने हॅंट्रिक घेताच स्टॅंडमध्ये धनश्री आनंदाने मारू लागली उड्या, व्हिडीओ होतोय व्हायरल
राजकुमार हिरानींच्या चित्रपटात ‘या’ लूकमध्ये दिसणार शाहरुख खान; बाबा सिद्दीकीच्या इफ्तार पार्टीमध्ये झाला खुलासा…

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now