अखेर राज्यसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे, ज्यामध्ये भाजपच्या धनंजय महाडिकांनी शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव केला आहे. संजय पवार आणि धनंजय महाडिक यांच्यात चुरशीची लढत झाली, पण यात महाडिकच जिंकले. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची खेळी यशस्वी ठरल्याचे म्हटले जात आहे. (bjp plan for dhananjay mahadik)
या निवडणुकीत नक्की कोण विजयी होणार याबाबत चर्चा होत होती, पण भाजपने अखेर धनंजय महाडिकांना विजयी करून दाखवले आहे. त्यामुळे धनंजय महाडिक चांगलेच चर्चेत आले आहे. अशात भाजप त्यांना एक मोठी जबाबदारी सोपवण्याच्या तयारीत आहे.
आगामी काळात धनंजय महाडिक यांची मंत्रीपदावरही वर्णी लागणार अशी चर्चा रंगली आहे. कोल्हापूरमध्ये महाडिक पुन्हा वर्चस्व गाजवताना दिसत आहे. गेल्या ३० वर्षांपासून महाडिक कोल्हापूरमध्ये कार्यरत असल्याने महाडिक गटाची एक वेगळीच ओळख बनली आहे.
महाडिक गटाने गेल्या तीस वर्षांपासून महापालिका, जिल्हा परिषद, दुग्ध संस्था यांच्यावर वर्चस्व गाजवलं आहे. पण गेल्या पाच-सहा वर्षांपासून हा महाडिक गट मागे हटताना दिसून येत आहे. तसेच कुठे सत्ता नसतानाही हा गट कोल्हापूर, सांगली, सोलापूरमध्ये कार्यरतमध्ये कार्यरत आहे.
आता या गटाला ताकद मिळवून देण्यासाठी एखाद्या मोठ्या पदाची आवश्यकता असणार आहे. ती आता खासदार पदामुळे मिळाली आहे. तसेच महाडिकांना जसे हे पद मिळाले आहे, तसेच भाजपलाही हे मोठे बळ मिळाले आहे. त्यामुळे महाडिकांचा हा विजय कोल्हापूरसाठी खुप महत्वाचा आहे.
भाजपला हवा तसा धडाडीचा आणि ताकदीचा नेता धनंजय महाडिकांच्या नावाने मिळाला. भाजपनेही त्यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन महाडिकांना विजय मिळवून दिला आहे. आता पश्चिम महाराष्ट्रात कमळाची ताकद वाढवण्याची जबाबदारी धनंजय महाडिकांवर सोपवली जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
फडणवीसांचा ‘तो’ आक्षेप बरोबरच; महाविकास आघाडीतील बड्या मंत्र्याने मान्य केली चूक
“मोदी पांडुरंगापेक्षा मोठे असू शकत नाही, त्यांनी आणि त्यांच्या पक्षातील लोकांनी तातडीने माफी मागावी”
पैगंबरांच्या नावाखाली हिंसाचार होऊ देणार नाही; मुस्लिम संघटनेची फतवा काढण्याची घोषणा