bjp : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नेहमीच आपल्या वक्तव्यांनी चर्चेत असतात. अनेकदा त्यांनी केंद्र सरकारवर देखील निशाणा साधत सरकारलाच घरचा आहेर दिला आहे. हे सांगण्याचे कारण म्हणजे, अलीकडे मोठं – मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून गेले आहेत. यावरून राजकारण तापले आहे.
याच मुद्याचा आधार घेत सध्या सत्ताधारी, विरोधकांमध्ये आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. याचाच धागा पकडत आता गडकरी यांनी देखील भाष्य केलं आहे. फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्कनंतर आता सी-२९५ या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एयरबस प्रकल्प’ महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे.
एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना गडकरी यांना प्रश्न विचारण्यात आला की, भाजपाची महाराष्ट्रात सरकार असूनही असं का होत आहे की प्रकल्प गुजरातमध्ये जात आहे. यावर उत्तर देताना गडकरी यांनी म्हंटलं की, ‘उद्योगधंदे अनेक ठिकाणी जातात. उद्योग कुठे स्थापन करायचा कुठे नाही हा गुंतवणूकदाराचा अधिकार असतो.’
पुढे बोलताना गडकरी यांनी म्हंटलं आहे की, राज्याच्या हातात नसून, गुंतवणूकदाराचा अधिकार असतो की उद्योग कुठे सुरु करायचा. गडकरी म्हणतात, ‘प्रत्येक जागेच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाबी असतात. कच्चा माल, कर सवलत यासारख्या गोष्टींचाही परिणाम होतो. काही राज्यांमध्ये अधिक करसवल दिली जाते.’
दरम्यान, याच मुलाखतीदरम्यान गडकरी यांनी म्हंटलं आहे की, ‘महाराष्ट्रात मिहानमध्ये फाल्कन आणि राफेल तयार केलं जातं आहे. महाराष्ट्रात विकास होतो आहे. गुजरातमध्येच प्रकल्प जावे असा दबाव केंद्राकडून टाकला जातो हे म्हणणं चुकीचं असल्याच गडकरी यांनी म्हंटलं आहे.
Indian Team : पाकिस्तानच्या विजयाने भारताचं टेंशन वाढलं, सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी उरलाय फक्त ‘हा’ एकमेव मार्ग
Vaishali Suryavashi : खबरदार! यापुढे माझ्या वडीलांचा फोटो लावला तर…; शिंदेगटातील आमदारावर बहीण भडकली
Team India : ‘हे’ पाच खेळाडू ठरलेत टीम इंडियाच्या विजयाचे हिरो; भन्नाट खेळी खेळत राखली संघाची लाज