Share

भाजप-मनसेची ‘या’ तारखेला होणार युती, त्याआधी राज ठाकरे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांनिमित्त आक्रमक भूमिका घेतली होती. मशिदींवरील भोंगे काढा अन्यथा लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावू, इशारा त्यांनी दिला होता. यावेळी त्यांनी हिंदूत्वाची भूमिका घेतलेली दिसून आली. (bjp mns alliance on 14 june)

त्यानंतर राज ठाकरेंची मनसे भाजपची टीम असल्याचा गंभीर आरोप सत्ताधरी पक्षातील नेत्यांनी केला होता. राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे लवकरच मनसे-भाजप युती होणार अशी चर्चाही होती. असे असतानाच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजप-मनसेची युती लवकरच घोषित करण्यात येणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.

येत्या ५ जूनला मनसे अध्यक्ष अयोध्या दौरा करणार आहे. त्यानंतर ते ६ जूनला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार आहे. यानंतर १४ जूनला युतीची औपचारिक घोषणा होईल, अशी माहिती आता सुत्रांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांत भाजप-मनसेची जवळीक वाढताना दिसून येत आहे, त्यामुळे आधीपासून युतीच्या चर्चा होत होत्या.

भाजपच्या अनेक नेत्यांनी राज ठाकरेंच्या भेटी घेतल्या आहे. मनसेने भोंग्याच्या मुद्यावरुन आक्रमक भूमिका घेतली होती. या भूमिकेला भाजपनेही पाठिंबा दिला होता. तिथूनच पुढच्या काळात भाजप मनसे युती करतील आणि राज्याच्या राजकारणात एकत्र पाहायला मिळतील, असे म्हटले जात होते, पण आता शिक्कामोर्तब झाला आहे.

१ मे रोजी राज ठाकरे औरंगाबादमध्ये सभा घेणार आहे. औरंगाबाद शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर राज ठाकरे ही सभा घेणार असून या सभेला परवानगीही मिळाली आहे. तसेच भाजपनेही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेची घोषणा केली आहे. मुंबईतल्या सोमय्या मैदानावर ही सभा होणार असून या सभेला बुस्टर डोस सभा असे नाव देण्यात आले आहे.

दरम्यान, राज ठाकरेंच्या सभेवर राज्यभरात वाद सुरु आहे. राज ठाकरेंना या सभेसाठी परवानगी मिळेल का नाही? असा प्रश्न पडला होता. आता पोलिसांनी या सभेला परवानगी दिली आहे. पण पोलिसांनी या सभेसाठी १६ अटी घातल्या असून त्यात ध्वनी प्रदुषण होणार नाही याची काळजी घ्यावी, असे पोलिसांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
भाजप-मनसेची ‘या’ तारखेला होणार युती, त्याआधी राज ठाकरे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! किसान सन्मान निधीच्या २ हजारांसोबत आता ३ लाखांची मदत सुद्धा मिळणार
शिवसेना आणि खलिस्तान समर्थकांमध्ये दंगल; दगडफेक आणि गोळीबारानंतर तलवारीनं हल्ला, पहा Video

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now