Share

अखेर छडा लागला..! पीएसआय भरती घोटाळ्यात भाजप आमदाराचा हात; स्वत: कबुली दिली, वाचा काय म्हंटलंय?

bjp flag
सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापलेलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या काही काळात महाराष्ट्रात विविध भरती घोटाळे समोर आले आहेत. अलीकडे आरोग्य विभागातील भरतीसह इतर विभागातील गैरव्यवहार उघड झाल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं.

चिंताजनक बाब म्हणजे, या घटना ताज्या असताना अलीकडेच कर्नाटकात देखील पीएसआय भरती घोटाळा उघड झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या घोटाळ्यात आता भारतीय जनता पक्षाचं कनेक्शन समोर आलं आहे. यामुळे सध्या भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.

अशातच आता आणखी एक बातमी समोर आली आहे.  पीएसआय भरती घोटाळ्यासंदर्भात भाजप आमदाराची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. भाजप (BJP) आमदार बसवराज दडेसुगुरु यांच्या आवाजाची ही ऑडिओ क्लिप असल्याची माहिती मिळाली आहे.

खुद्द भाजप आमदार बसवराज दडेसुगुरु (Basavaraj Dadesuguru) यांनी पीएसआय भरतीमध्ये पैसे घेतल्याची कबुली दिली आहे. यामुळे आता भाजपच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दढेसुगुरु यांनी बळ्ळारी जिल्ह्यातील सिरगुप्पा येथील परसप्पा नावाच्या व्यक्तीकडून पैसे घेतल्याची कबुलीच दिली आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी परसाप्पा यांच्या मुलाच्या नियुक्तीसाठी पैसे घेतलेला ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकरणी आता विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. विरोधी पक्ष थेट आमदाराच्या अटकेची मागणी करत आहेत. यामुळे आता भाजप आमदारावर काय कारवाई होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

याचबरोबर व्हायरल ऑडिओ क्लिपबाबत बोलताना खुद्द आमदार दडेसुगुरु म्हणाले, आवाज माझा आहे. मात्र, मी पैसे घेतलेले नाही. भांडण सोडवण्यासाठी दोघे माझ्याकडे आले होते. ते मी मिटविले, असे त्यांनी सांगितले. यामुळे आता या प्रकरणातील गुंता अधिकच वाढणार असल्याच चित्र सध्या दिसतं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

…तर आम्ही राज ठाकरेंनाच बाहेर काढू; भाजपच्या केंद्रीय मंत्र्याने स्पष्टच सांगीतलं
‘आम्हाला नाही, तर तुम्हालाही नाही’, शिंदे गटाने आखली वेगळीच रणनीती, उद्धव ठाकरेंसमोरील अडचणींमद्धे वाढ
Supreme Court : शिंदेगटाची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली, ठाकरे गटाला मोठा दिलासा; पहा काय घडलं कोर्टात…
Girish Bapat : …म्हणून मी पक्षावर नाराज आहे; पुण्यातील भाजपच्या बड्या नेत्याने जाहीरच सांगीतले

इतर क्राईम ताज्या बातम्या राजकारण राज्य शिक्षण

Join WhatsApp

Join Now