राज्याच्या राजकीय आखाड्यात आता ब्राह्मण महासंघाने देखील उडी घेतली आहे. ‘देवेंद्र फडणवीस यांना बळजबरीने उपमुख्यमंत्री पदावर बसवण्यात आले. या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांचे खच्चीकरण करण्यात आले, असा खळबळजनक आरोप ब्राह्मण महासंघाने यांनी केला.
वरिष्ठ पातळीवर ठरल्याप्रमाणे पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाची घोषणा केली. फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांचे नाव घोषित करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची विनंती केली.
त्यानंतर खुद्द पंतप्रधान मोदी यांनी फडणवीस यांना दोनवेळा फोन करून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यासाठी आग्रह केला असल्याची माहिती मिळत आहे. अन् अखेर पक्षादेश मान्य करून देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. खरं तर राज्याचं मुख्यमंत्रीपद फडणवीसांना हवं होतं.
तर आता या राजकीय लढाईत आता ब्राह्मण महासंघाने उडी घेत एक पोस्ट व्हायरल केली आहे. सध्या ती सोशल मिडियावर तुफान व्हायरल होतं आहे. फडणवीस यांनी आपल्या राजकीय कौशल्याने भाजपला पुन्हा सत्तेत आणले. मात्र भाजप नेतृत्त्वाने शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचे आदेश दिले.
त्यानंतर पक्ष श्रेष्ठींकडून फडणवीस यांना बळजबरीने उपमुख्यमंत्री पदावर बसवण्यात आले. यामुळे फडणवीस यांचे खच्चीकरण करण्यात आले, असा आरोप अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी केला. कुलकर्णी यांनी याबद्दल एक फेसबुक पोस्ट केली आहे.
वाचा गोविंद कुलकर्णी यांनी आपल्या पोस्टमध्ये काय म्हंटलं आहे..?
भाजपा मध्ये ब्राह्मणांचे खच्चीकरण !पंतप्रधान स्पर्धा मधून हटविण्यासाठी नितीन गडकरीच्या चारीत्र हननाच्या माध्यमातून खच्छीकरण केल्या नंतर गेले तिन वर्षा पासुन भाजपातील तथाकथीत नेते मंडली देवेंद्र फडणविस यांचा घोडादौड अडविण्या करीता पूर्ण बहुमतापेक्षा अधीक संख्या आमदारांना निवडून आल्यानंतर सरकार न बनविण्याचा शड्यंत्र आखून योजनाबद्ध पद्धतिने देवेंद्र फडणवीस याना सत्तेपासून लांब ठेवण्यात आले.
आत्ता फडणविस यांनी आपल्या राजकीय कौशल्यातून पुन्हा भाजपाला सत्तेचा दारापर्यंत पोहचविले नंतर मा.एकनाथ शिंदे यानां मुख्यमंत्री बनविण्याचे निर्देशन दिले. देवेंद्र फडणविस यांनी मोठे मनाने मुख्यमंत्री पदाचे त्याग करून कार्यकर्ता म्हणून काम करण्याचे ठरविल्या नंतर भाजपातील वरीष्ठ नेत्रत्वाने बलजबरीने उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यासाठी आग्रह धरून देवेंद्र फडणवीस यांच्या खच्चीकरण करण्यात आले आहे.
भाजपा मध्ये एकानंतर एक ब्राह्मण नेत्रत्वाचा खच्चीकरण करण्याचे एक सुनियोजित कायस्थान चाललेला निदर्शनात येत आहे. याघटनेचा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ तीव्र शब्दात निषेध करीत आहे, अशी पोस्ट गोविंद कुलकर्णी यांनी केली आहे. सध्या ती सोशल मिडियावर तुफान व्हायरल होतं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
बातमी विद्यार्थ्यांसाठी! बारावीनंतर ‘हे’ कोर्सेस करा, नोकरीची १०० टक्के खात्री
आलिया-दीपिका नाही तर ‘ही’ अभिनेत्री आहे रणबीर कपूरची फेव्हरेट, म्हणाला, तिच्यासोबत रोमान्स…
‘त्या’ पत्राने घात केला अन् शिकारी स्वतःच जाळ्यात अडकला; वाचा फडणवीसांबद्दल नेमकं काय घडलं
KGF मधील प्रसिद्ध अभिनेत्याचा भयानक अपघात, कारला ट्रकने दिली धडक, पोलिसांनी ट्रक चालकाला घेतलं ताब्यात