Share

‘रावसाहेब दानवेंना लहानपणापासूनच फुकटात खायची सवय’, फुकट वडापाव प्रकरणात नवा खुलासा

danave

आपल्या भारतीय राजकारणात केव्हा कोणता विषय चर्चेचा ठरलं, याचा आपण अंदाजच लावू शकत नाही. सध्या असेच एक वडापाव प्रकरण चर्चेत आलं आहे. ठाणे स्टेशनबाहेरील गजानन वडापाव सेंटरमधील भाजप नेत्यांचा या व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतं आहे. यावरून राजकारण देखील चांगलच रंगलं आहे. (bjp leaders eating vadapav in gajanan hotel)

ठाणे स्टेशनबाहेरील गजानन वडापाव सेंटरमधील या व्हिडीओत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, भाजप नेते विनय सहस्त्रबुद्धे, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह अनेक भाजपा कार्यकर्ते वडापाववर ताव मारताना दिसत आहेत.

सर्व नेते आणि कार्यकर्ते तब्बल २०० वडापाव खाऊन पैसे न देताच निघून गेल्याचा आरोप झाला. यानंतर भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी हॉटेल मालकाला पैसे अदा करत या वादावर पडदा टाकला. यावरूनच आता भाजपवर टीकेचा भडीमार होताना पाहायला मिळत आहे. त्यातच बिल न दिल्याचा आरोप झाल्याने विरोधकांनी भाजपावर सडकून टीका केली.

याचाच धागा पकडत राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी टीका केली आहे. मी माजी खासदार स्वर्गीय पुंडलिक हरी दानवे यांचा मुलगा असल्याने रावसाहेब दानवे यांना लहानपणापासून काय काय खाण्याच्या सावयी आहे हे मला चांगल्या प्रकारे माहिती आहे असे म्हणत चंद्रकांत दानवे यांनी खोचक टोला लगावला आहे.

तसेच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी तालुक्याचीच नव्हे जिल्ह्याचीही बदनामी केल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. रावसाहेब दानवेंना लहानपणापासूनच फुकटात खायची सवय असल्याचे देखील त्यांनी म्हंटले आहे. याचबरोबर जितेंद्र आव्हाड यांनी उल्हासनगरमधील एका कार्यक्रमात बोलताना फुकट वडापाव खाणाऱ्यांची तुमचं शहर सांभाळण्याची औकात नाही, असं म्हणत भाजप मंत्र्यांवर अप्रत्यक्ष टोला लगावला.

दरम्यान, केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार आणि भाजपा कार्यकर्त्यांनी गजानन वडापाव सेंटरमध्ये २०० वडापाव आणि अनेक प्लेट भजी खाल्ली. मात्र, बिल न देताच निघून गेले. त्यामुळे हॉटेलमधील काही कर्मचाऱ्यांनी याचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर टाकला. त्यानंतर याला राजकीय वळण लागले.

महत्त्वाच्या बातम्या
उद्धव ठाकरेंनी पत्नीवर अन्याय केला, मुख्यमंत्री पदाची खुर्ची वाचवण्यासाठी.., सोमय्यांचा खळबळजनक आरोप
दरेकरांच्या गाडीला तिसऱ्यांदा अपघात, तिन्ही अपघात सारखेच, घातपाताचा संशय आल्याने उचलणार ‘हे’ पाऊल
एकनाथ खडसेंची देवेंद्र फडणवीसांवर जहरी टीका; ‘मी टरबुज्या म्हणणार नाही, पण…’,
मी त्यांचा शिवसैनिक आहे आणि…; तुरुंगातून सुटल्यानंतर हिंदूस्थानी भाऊचे मोठे वक्तव्य

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now