राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, ‘सनातन धर्म हे हिंदू राष्ट्र आहे. 15 वर्षात भारत पुन्हा अखंड भारत बनेल. आपण हे सर्व आपल्या डोळ्यांनी बघू. संतांच्या वतीने ज्योतिष शास्त्रानुसार 20 ते 25 वर्षात भारत पुन्हा अखंड भारत होईल, असे ते म्हणाले.
आपण सर्वांनी मिळून या कार्याचा वेग वाढवला तर १० ते १५ वर्षांत अखंड भारताची निर्मिती होईल, असेही ते म्हणाले. ब्रह्मलिन महामंडलेश्वर श्री १००८ स्वामी दिव्यानंद गिरी यांची मूर्ती असलेल्या प्राणप्रतिष्ठा आणि श्री गुरुत्रय मंदिर समर्पित करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख बुधवारी कंखळ येथील संन्यासा रोडवरील श्रीकृष्ण निवास आणि पूर्णानंद आश्रमात दाखल झाले होते.
याबाबत राणा यांना माध्यमांनी सवाल उपस्थित केला. त्या म्हणाल्या, ‘भागवत गेल्या अनेक दिवसांपासून लोकांसाठी काम करत आहेत,त्याच बरोबर ते भारतासाठीही काम करत असून त्यांच्या विचारांचे आम्ही समर्थन करतो.ज्या दिवशी अखंड भारताचे स्वप्न साकार होईल त्यादिवशी आम्ही सगळे जोरदारपणे जल्लोष साजरा करु.’
पुढे त्या म्हणाल्या, ‘आम्ही त्यांच्या सोबतच आहोत, त्यांच्या विचारामुळे भारताचे एकही अंग बाजूला राहता कामा नये तर भारत हा अखंड भारत झाला पाहिजे या स्वामी विवेकानंदाचे स्वप्न साकार करु असेही त्या म्हणाल्या. दरम्यान, मोहन भागवत यांनी केलेल्या विधानावर आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
वाचा काय म्हणाले मोहन भागवत.. भागवत म्हणाले, ‘गंगेच्या प्रवाहाप्रमाणे आपले राष्ट्रीयत्व वाहत आहे, जोपर्यंत राष्ट्र आहे,तोपर्यंत धर्म आहे. धर्माच्या प्रयत्नांच्या उन्नतीसाठी प्रयत्न झाले, तर भारताची उन्नती होईल. एक हजार वर्षांपासून भारतात सनातन धर्म नष्ट करण्याचे सातत्याने प्रयत्न होत होते, पण ते नाहीसे झाले, पण आम्ही आणि सनातन धर्म आजही आहोत.