Share

..तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे तुरूंगात जाणार; नवनीत राणांच्या विधानाने राज्यात खळबळ

rashmi

काल झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर आता राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. तर दुसरीकडे राणा दाम्पत्य आणि शिवसेना यांच्यातील शाब्दिक युद्ध आता टोकाला गेलं आहे. ‘मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणायला आलेले पळून गेले,’ अशा शब्दात काल उद्धव ठाकरेंनी राणा दाम्पत्यावर टीका केली.

याचाच धागा पकडत आता ‘काश्मिरमध्ये हनुमान चालिसा म्हणू शकते तर महाराष्ट्रात का नाही, शिवसेना औरंगजेबाची सेना झाली आहे का?,’ असा सवाल अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. राणा दाम्पत्याने रविवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात भाष्य केले.

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, ‘उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद आणि सत्ता गेल्यावर रश्मी ठाकरे ठाकरे या तुरुंगात जाऊ शकतात, असे खळबळजनक वक्तव्य नवनीत राणा यांनी केल आहे. उद्धव ठाकरेंची सत्ता गेल्यावर रश्मी ठाकरे यांना तुरुंगात जावे लागले तर मी उद्धव ठाकरेंना,’आता तुम्हाला कसं वाटतंय’, असा सवाल विचारेन, असे नवनीत राणा यांनी म्हटले.

पुढे बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, ‘मला मुख्यमंत्री हनुमान चालिसा काश्मीरमध्ये जाऊन म्हणा. जर मी काश्मिरमध्ये हनुमान चालिसा पठण करू शकते तर महाराष्ट्रात का नाही? मी नवनीत राणा, रवी राणाच्या फायद्यासाठी हनुमान चालिसा म्हणणार नव्हते, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले.

याचबरोबर ‘मुख्यमंत्री साहेब हनुमान चालिसा म्हणण्याची मागणी करणाऱ्या महिलेला तुम्ही देशद्रोहाच्या आरोपाखाली जेलमध्ये टाकता. पण औरंगजेबाच्या कबरीवर फूल वाहणाऱ्यांबद्दल एक शब्दही बोलत नाहीत. शिवसेना औरंगजेबाची सेना झाली आहे का?, असा संतप्त सवाल नवनीत राणा यांनी उपस्थित केला.

दरम्यान, ‘सत्तेत आल्यानंतर औरंगाबादचं नाव संभाजीनगर करायचं तुम्हीच म्हणाला होता. पण सभेत बोलताना त्याची काही गरज नाही म्हणता. एक नाव बदलू शकत नाहीत, इतके लाचार मुख्यमंत्री आहेत,’ असं म्हणत नवनीत राणा यांनी थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष केलं.

महत्त्वाच्या बातम्या
..तेव्हा बाळासाहेब ठाकरे कृष्णकुंजवर राज ठाकरेंकडे रहायला आले होते; मनसे नेत्याचा गौप्यस्फोट
नेहा शर्माच्या बोल्ड फोटोंनी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ, अभिनेत्रीने ओलांडल्या सर्व मर्यादा
VIDEO: नेहा शर्माचा सेक्सी जिम व्हिडिओ पाहून चाहतेही झाले थक्क, बोल्ड अंदाजात करत आहे व्यायाम
करोडपती भिकारी! जंगम मालमत्ता, आलिशान बंगला, अफाट बँक बॅलन्स, तरीही मागतो भीक

इतर क्राईम ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now