Share

नवनीत राणा संसदीय समितीसमोरही ढसाढसा रडल्या; म्हणाल्या, ‘आता तुम्हीच न्याय द्या!’

rana

सध्या महाराष्ट्रात राणा दाम्पत्य आणि शिवसेना यांच्यातील वाद वाढत चालला आहे. गेल्या काही दिवसांपासून खासदार नवनीत राणा चांगल्याच चर्चेत आल्या आहे. हनुमान चालिसा पठणाप्रकरणी मुंबई पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांची तुरंगातून सुटका झाल्यानंतर ते काल दिल्लीसाठी रवाना झाले.

सोमवारी (काल) संसदीय समितीसमोर नवनीत राणा यांनी आपली आज बाजू मांडली. यावेळी बोलताना नवनीत राणा यांनी मुंबई पोलिसांना लक्ष केलं. संसदेच्या विशेषाधिकार समितीसमोर आपण आपल्याला दिलेल्या वागणुकीची सविस्तर माहिती दिली, असून ही समितीच आपल्याला न्याय देईल असे नवनीत राणा यांनी सांगितले.

संसदेच्या विशेषाधिकार समितीसमोर बोलताना राणा म्हणाल्या, ”संसदीय समिती मुंबई पोलिसांच्या वरिष्ठांनाही बोलावेल. त्यांना समितीसमोर यावेच लागेल. मी माझी व्यथा संसदेच्या विशेषाधिकार समितीसमोर मांडली. त्यांच्याकडून आपल्याला न्याय मिळेल, अशी इच्छा नवनीत राणांनी व्यक्त केली.

ते याबाबत बोलताना माध्यमांशी बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, ‘हनुमान चालीसा किंवा एखादे धार्मिक स्त्रोत्र म्हटल्याने देशद्रोहाचा गुन्हा कसा दाखल होऊ शकतो? असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला.” दरम्यान, संसदेच्या विशेषाधिकार समितीसमोर बोलताना नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाल्याची मिळत आहे.

दरम्यान, तुरुंगात असताना पोलिसांनी मला त्रास दिला, असा आरोप नवनीत राणा यांनी केला. संसदेच्या विशेषाधिकार समितीसमोर जाण्याआधी देखील नवनीत राणा यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. ‘ज्यांनी तुरुंगात माझा छळ केला आणि माझ्यासोबत तुरुंगात जे काही घडलं ते सगळं मी समितीसमोर मांडणार असल्याच त्यांनी सांगितलं होतं.

तसेच ‘मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्यासह ज्या ज्या विभागातील अधिकाऱ्यांनी मला त्रास दिला त्यांचा जबाब नोंदवावा, अशी विनंती मी करणार आहे, असं म्हणत त्यांनी मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांना इशारा दिला होता. यामुळे आता पुन्हा राणा दाम्पत्य चांगलेच चर्चेत आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या
जुळे असल्याचा घेतला गैरफायदा, भावाच्या पत्नीसोबत केलं धक्कादायक कृत्य; वाचून पायाखालची जमीन सरकेल
भाजप मनसे युतीचा राज्यातील पहीला विजय; १३ पैकी ११ जागा जिंकत केला राष्ट्रवादीचा सुपडा साफ
राज ठाकरेंचा अयोध्या दौरा रद्द होण्यासाठी महाराष्ट्रातून पवारांनी रसद पुरवली? मनसे नेत्याने शेअर केला ‘तो’ फोटो
मोठा खुलासा! मुंबईच्या विजयाचा हिरो टीम डेव्हिडला RCB ने सामन्याआधी पाठवला होता ‘हा’ मेसेज

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now