uddhav thackeray : राजयकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच बुधावरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी गोरेगावमध्ये झालेल्या सभेत भाजप आणि शिंदे गटावर जहरी टीका केली. यावरून आता राजकारण तापलं आहे. उद्धव ठाकरेंच्या टीकांना आता भाजपकडून भाजप नेते नारायण राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
‘उद्धव ठाकरेंनी दारू पिऊन भाषण केलं,’ अशी जहरी टिका राणेंनी केली. पत्रकार परिषदेत बोलताना राणे म्हणाले की, “आदित्य ठाकरे तर तुरुंगात गेल्यावर बाहेरच येणार नाहीत, अन् तुम्ही उद्या संजय राऊत यांचा सोबती म्हणून तुरुंगात जाल,” असं मोठं वक्तव्य नारायण राणेंनी केलं आहे.
यामुळे नवीन वादाला आता तोंड फुटले आहे. पुढे बोलताना राणे यांनी उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केला आहे. ‘लांडगा लबाड, खोटारडा असतो. म्हणून मी त्याला लबाड लांडग्याची उपमा दिली आहे. बाप पळवणाऱ्याची औलाद फिरतेय असं उद्धव बोलले. पण बापाचे विचार अन् ध्येय धोरण राबवले नाही, साहेब सन्मान करायचे. हा तसा नाही, असं राणे म्हणाले.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, उद्धव म्हणतात, गद्दारांना सत्तेचं दूध पाजलं. मग सत्तेत असताना खोक्याच्या रुपात तूप कोणी खाल्ल? उद्धव ठाकरेंची औकात आहे का ? हिंदुत्वासाठी कोणतं काम केलं…? अशा जहरी शब्दात नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष केलं.
दरम्यान, ‘यांनी मुंबई महानगरापालिका धुतली, मुंबईकरांचं शोषण केलं याने. एवढ्या वर्ष महानगरपालिका यांच्याकडे. पण यांनी मुंबई बकाल केली. बेस्टमध्ये वेळेत पगार नाही, महानगरापालिकेत पगार नाही. काही येत नाही याला. हा जगातला ‘ढ’ माणूस आहे,’ असं राणे म्हणाले.
उद्धव ठाकरे 6 वर्षाचे होते तेव्हा शिवसेनेचा जन्म झाला. ते 1999 मध्ये पक्ष कार्यालयात आले. मी मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरेंना वाटलं ते सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतात. उद्धव ठाकरेंनी पक्ष वाढीसाठी कधी संघर्ष केला का ? असा संतप्त सवाल राणे यांनी उपस्थित केला.
politics : नाशिकमध्ये शिवसेनेला मोठा हादरा, तब्बल १७ पेक्षा जास्त माजी नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर
Shivsena : शिंदे गटाचा खोटारडेपणा आला समोर, आठ राज्यांच्या शिवसेनाप्रमुखांची ठाकरेंच्या सभेला हजेरी
Banglore : इन्स्टावर न्युड फोटो शेअर केल्याने भडकली गर्लफ्रेंड, मित्रांसोबत मिळून ‘असा’ केला बॉयफ्रेंडचा खून
Health : हृद्यविकाराचा झटका सकाळीच का येतो? कोणाला याचा धोका जास्त असतो? वाचा आणि सावध व्हा!