bjp : शिवसेनेत दोन गट पडल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे चांगलेच अडचणीत सापडले आहे. शिंदे गट आणि ठाकरे गट एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. यामुळे सध्या उद्धव ठाकरेंसमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. असं असलं तरी देखील अजूनही ठाकरेंची शिवसेना सावरलेली नाहीये.
असं असतानाच, उद्धव ठाकरेंना धक्का देणारी एक मोठी बातमी समोर येतं आहे. ती म्हणजे, आगामी काळात शिवसेनेमध्ये मोठी फुट पडणार असल्याचं एका भाजप नेत्याने म्हंटलं आहे. यामुळे पुन्हा एकदा ठाकरे गटात खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरेंवर सडकून टीका करणारे भाजप नेते नारायण राणे यांनी एक मोठा दावा केला आहे.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील चार आमदार संपर्कात असल्याचा दावा नारायण राणे यांनी केला आहे. यामुळे ठाकरे गटात एकच खळबळ उडाली असून राणे यांनी केलेल्या दाव्यामुळे शिवसेनेत उभी फुट पडणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
रोजगार मेळाव्यात बोलताना राणे यांनी म्हंटलं आहे की, ‘उद्धव ठाकरे गट आता कुठे राहिलाय? शिवसेना संपली आहे. 56 आमदारावरुन सहा सातवर आले आहेत. त्यातील काही ऑन दी वे आहेत. माझ्या संपर्कात चार आमदार आहेत, असा खळबळजनक दावा राणे यांनी केला आहे.
पुढे बोलताना राणे यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. राणे म्हणाले की, शिधा वाटपाला काही उशीर झालं नाही, हे राजकारण सुरु आहे…आता काही हातात राहिलं नाही. घरबसल्या षडयंत्र करत रहायचं एकच काम आहे.’ तसेच पुढे बोलताना राणे यांनी शिवसेना आमदार भास्कर जाधव यांच्यावर देखील निशाणा साधला.
जाधव यांच्यावर राणेंनी साधताना म्हंटलं आहे की, मीटिंग घेतली म्हणजे बालेकिल्ला झालं असं नाही. सांगून घ्यावी ना…मी पणं मिमिक्री करु शकतो…पणं याला टिंगल म्हणातात. कोणाची टिंगल मस्करी करणे हे चांगले गुण नाहीत. त्यांच्या हल्ल्याची मला काही माहिती नाही.
सनी देओलच्या मुलाचा झाला गुपचूप साखरपुडा; काय आहे नेमकं यामागील कारण वाचा
Sunny Deol: सनी देओलच्या ‘चुप’ने बाकीच्या चित्रपटांना केलं ‘चिडीचुप’ पहिल्याच दिवशी केली विक्रमी कमाई
Sunny Deol: राहायला नव्हते घर, उपाशीपोटी काढले दिवस, अजूनही मला.. सनी देओलच्या अभिनेत्रीची कहाणी ऐकून डोळ्यातून पाणी येईल