Share

मोठी बातमी! केंद्रीयमंत्री नारायण राणेंची प्रकृती अचानक बिघडली, लीलावती रुग्णालयात दाखल

narayan rane

केंद्रीयमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अचानक प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालायात दाखल करण्यात आले आहे. (bjpleadernarayan rane admitted in leelavati)

नारायण राणेंना मुंबईतील लीलावती रुग्णालयात कोरोनरी अँजिओग्राफीसाठी हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या एक्स-रेसाठी अँजिओप्लास्टी ऑपरेशनसाठी दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

नारायण राणे हे हृदयविकाराच्या त्रासामुळे त्रस्त आहे. अशात त्यांची प्रकृती अचानक खालावली होती. त्यामुळे मुंबईच्या लीलावती रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. आता त्याच रुग्णालयात त्यांच्यावर पुढील उपचार केले जाणार आहे.

केंद्रीय मंत्री असल्यामुळे त्यांच्या कामाचा ताण वाढला आहे. त्या कामाचा ताण आल्यामुळे त्यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा त्रास त्यांना काही दिवसांपासून जाणवत होता. पण आज अचानक त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, नारायण राणे हे गुरुवारी चर्चेत आले होते. शिवसेना नेते आणि राज्याचे मंत्री अनिल परब यांच्या मालमत्तेवर ईडीने धाड टाकली आहे. त्यामुळे नारायण राणेंच्या समर्थकांनी अनिल परबांवर टीका केली होती. नारायण राणेंना अटक करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना अनिल परबांनीच दिले होते, असे म्हटले जात होते. त्यामुळे अनिल परबांनाही त्यांच्या कर्माचं फळ भेटलं, असे नारायण राणे समर्थक म्हणताना दिसून येत होते.

महत्वाच्या बातम्या-
तब्बल ५ वर्षांनी भारतात परफॉर्म करणार जस्टिन बीबर, जाणून घ्या ठिकाण आणि तिकीटाची किंमत
भारत सोडून चालला होता, एक फोन आला, बँग भरली अन्.., वाचा RCB च्या रजत पाटीदारची कहाणी
‘कोरोना वाढत आहे, मास्क वापरा’; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागरिकांना आवाहन

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now