अखेर धारावी येथील विद्यार्थी आंदोलन आणि गर्दी प्रकरणी हिंदुस्थानी भाऊला (Hindustani Bhau) अटक करण्यात आलं आहे. धारावी पोलिसांनी काल रात्री उशिरा ही कारवाई केली आहे. विद्यार्थ्यांना (Student Protest) चिथावल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी ही कारवाई करण्यात आहे.
दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्या या मागणीसाठी मुंबईसह अनेक ठिकाणी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या विद्यार्थ्यांना हिंदुस्थानी भाऊने भडकवल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. अखेर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
आता यावरून राजकारण तापले आहे. भाजपाने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. हिंदुस्थानी भाऊची सुटका झाली पाहिजे, आम्ही सगळे त्याच्या सोबत आहोत. जर त्यांची सुटका नाही झाली तर आम्ही आंदोलन करू, असा इशारा माजी पदाधिकारी मोहित कंबोज यांनी राज्य सरकारला दिला आहे.
व्हिडिओ ट्विट करत कंबोज यांनी म्हंटले आहे की, ‘मला असं वाटतं विद्यार्थी हे भविष्य आहेत आणि त्यांच्यासोबत काही अन्याय होत असेल, त्यांचा आवाज कोणी सरकारसमोर मांडत असेल तर त्याच्यावर कारवाई होणं चुकीचं आहे. ज्या प्रकारे गुन्हा दाखल करुन हिंदुस्थानी भाऊला अटक करण्यात आली, हे निंदनीय कार्य महाराष्ट्र सरकारनं केलं आहे.’
https://twitter.com/mohitbharatiya_/status/1488371989555609602?s=20&t=IoUKT-QTfc–D6XurpRgSg
पुढे ते म्हणतात, ‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी स्वत: या घटनेची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर हिंदुस्थानी भाऊला सोडलं पाहिजे. विद्यार्थी आपल्या देशाचं भविष्य आहेत. त्यांच्यासोबत कोणता अन्याय झाला किंवा आंदोलन करणं, मोर्चा काढणं हा जर राज्यात गुन्हा ठरत असेल तर देशात, राज्यात सरकार असहिष्णू झालंय यापेक्षा मोठी कोणतीही बाब असू शकत नाही.’
दरम्यान, दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्या या मागणीसाठी मुंबईसह अनेक ठिकाणी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या विद्यार्थ्यांना हिंदुस्थानी भाऊने भडकवल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. अखेर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
सरकारला घाम फोडणारा विकास पाठक उर्फ हिंदुस्तानी भाऊ आहे तरी कोण? त्याची एकूण कमाई किती?
ट्रक थांबवून पाणी आणायला गेलेला भाऊ परत आलाच नाही, शोध घेतल्यानंतर बसला जबर धक्का
महिला शिक्षिकेने आपल्याच विद्यार्थ्याशी बनवले शारीरिक संबंध; नंतर शिक्षेपासून वाचवण्यासाठी केले ‘हे’ लाजिरवाणे कृत्य
ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन; दोन दिवसांपूर्वीच साजरा केला होता 93वा वाढदिवस