bjp : राजकीय वर्तुळातून अनेकदा असे काही व्हिडिओ समोर येतात की, ते पाहून सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकतो. हे सांगण्याच कारण म्हणजे, सध्या असंच एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतं आहे. भर पत्रकार परिषदेमध्ये एक नेता ढसाढसा करत असल्याच पाहायला मिळत आहे.
वाचा नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या महितीनुसार, या नेत्याचं नाव राजकुमार धनौरा असं आहे. पक्षानं त्यांची हकालपट्टी केली आहे. पक्षानं हकालपट्टी राजकुमार धनौरा यांना अश्रु अनावर झाले आहेत. सध्या हा व्हिडिओ प्रसार माध्यमांमध्ये प्रचंड व्हायरल होतं आहे. सर्वत्र सध्या याच व्हिडिओची तुफान चर्चा सुरू आहे.
राजकुमार धनौरा यांची एका वेगळ्या कारणामुळे हकालपट्टी केली आहे. सुरखी येथील आमदारांबाबत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे धनौरा यांच्यावर पक्षाने मोठी कारवाई केली आहे. पक्षाने राजकुमार धनौरा यांना सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. यामुळे सध्या पक्षात खळबळ उडाली आहे.
माध्यमांशी बोलताना धनौरा यांनी म्हंटलं आहे की, ‘माझ्यावर एक रुपयाचाही कलंक असेल तर सांगा. पक्षाने मला ३० वर्षांच्या मेहनतीनंतरही एका मिनिटात किड्या-मुंगीप्रमाणे उचलून फेकून दिले. असं सांगताना धनौरा यांना अश्रु अनावर झाले. ते पत्रकार परिषदेत ढसाढसा रडू लागले.
पुढे बोलताना धनौरा यांनी सांगितले की, मी संघटनेसमोर म्हणणं मांडलं. अध्यक्ष बी. डी. शर्मा यांचीही भेट घेतली. जर काही चूक झाली असेल तर मी पक्षाची माफी मागतो, असेही सांगितले. मात्र त्यानंतरही माझ्यावर हा अन्याय करण्यात आला, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
Thackeray group : अखेर शिवसैनिकांनी बदला घेतलाच; बंडखोरांना गावागावात घेरलं अन् पाडलं तोंडघशी
Kolhapur : …मग तेव्हा का भाजपने राजकारणाची संस्कृती जपली नाही’; कोल्हापुरची वाघीन कडाडली
Telangana: चेकपोस्टवर भाजप नेत्याच्या कारमध्ये पोलिसांना सापडली नोटांची रास; विचारणा केली असता म्हणाला…