Share

‘त्या’ पत्राने घात केला अन् शिकारी स्वतःच जाळ्यात अडकला; वाचा फडणवीसांबद्दल नेमकं काय घडलं

devendra fadanvis

महाराष्ट्राच्या राजकारणातील नाट्यमय घडामोडींनतर एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने अखेर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आहे. त्यानंतर आता शिंदे भाजपसोबत सत्ता स्थापन करताना दिसून येत आहे.

भाजपसोबत सरकार स्थापन करताना त्यांना उपमुख्यमंत्रिपद मिळेल अशी चर्चा होती, मात्र देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा केली. स्व: ता फडणवीस यांनी हे स्पष्ट केलं की, शिंदेंच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होतील. फडणवीस स्व: ता मंत्रिमंडळातून बाहेर राहणार आहेत. या सरकारमध्ये शिंदे गट आणि भाजपाचे मंत्री सहभागी असतील असं त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

शिंदेंना मुख्यमंत्रिपदी बसवून देवेंद्र फडणवीसांनी मोठेपणा दाखवला. मात्र असे करून फडणवीसांनी शिवसेनेचा काटा काढला, असे नाही, तर दिल्लीश्‍वरांनी फडणवीसांचा काटा काढल्याच सूचक वक्तव्य कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे.

लोंढे यांनी यावेळी बोलताना आज सकाळी दिल्लीवरून आलेल्या एका पत्राचा देखील उल्लेख केला आहे. ‘मी आज सायंकाळी मी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार, असल्याच सकाळी पत्रकारांशी बोलताना फडणवीसांनी सांगितले होते. मात्र दिल्लीवरून जे पत्र आलं ते शिंदे यांच्या नावाचं होतं, असं लोंढे यांनी यावेळी म्हंटलं आहे.

दरम्यान, मूळ शिवसेना संपविण्यासाठी भाजपने अनेक प्रयत्न केले. त्यातच शिकार स्वतः त्यांच्या जाळ्यात आला. मात्र असं असलं तरी देखील हा मास्टरस्ट्रोक भाजपच्या दिल्लीश्‍वरांचा आहे, देवेंद्र फडणवीसांचा नाही, असेही लोंढे यावेळी बोलताना स्पष्टच बोलले.

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील अशी चर्चा होती. पण आज दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील अशी घोषणा केली. तसेच आता एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे, तर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या
भाजपने एका दगडात अनेक पक्षी मारले; शिंदेंना मुख्यमंत्रिपद देण्यामागे आहेत ‘ही’ ४ कारणे
उद्धवजींनी पुन्हा जनतेची मन जिंकली; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिल्या ‘या’ खास शुभेच्छा
‘फडणवीस शिवसेनेचा काटा काढायला गेले पण दिल्लीश्‍वरांनीच त्यांचाच काटा काढला’
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच बंडखोर आमदारांची हैराण करणारी प्रतिक्रीया; टेबलावर चढून…

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now